Join us  

मुंबईकरांवर पाणीसंकट

By admin | Published: June 24, 2014 12:45 AM

पावसाची दडी आणि तलावांमध्ये घटत असलेल्या पाण्याच्या पातळीने धोक्याची घंटा वाजवली आह़े

मुंबई : पावसाची दडी आणि तलावांमध्ये घटत असलेल्या पाण्याच्या पातळीने धोक्याची घंटा वाजवली आह़े मात्र कायम पावसाच्या पाण्यावरच अंवलबून राहिलेल्या मुंबईकडे अद्याप बॅक अॅप प्लॅन नाही़ त्यात पालिका अधिका:यांनीही वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतल्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट घोंघावू लागले आह़े
उशिरा दाखल झालेल्या मान्सूनने अद्याप जोर धरलेला नाही़ तलाव क्षेत्रतही त्याची उपस्थिती नगण्यच आह़े त्यामुळे गतवर्षी या काळात असलेल्या पाणीसाठय़ाच्या तुलनेत निम्मा साठा तलावांमध्ये शिल्लक आह़े दिवसेंदिवस कमी होत असलेली पाण्याची पातळी मुंबईसाठी चिंतेचा विषय ठरली आह़े मात्र कृत्रिम पावसाबाबत अद्याप पालिका प्रशासन चाचपडत आह़े
मुंबईतला विहार तलाव कोरडा होण्याची वेळ आली, तर अप्पर  वैतरणातून पाणी घेण्यास बंद केले आह़े तानसा तलावाची अवस्था याहून वेगळी नाही़ त्यामुळे मोडक सागर आणि भातसावरच मुंबईची मदार आह़े त्यामुळे पावसाचा नूर असाच राहिल्यास पाणीकपात लागू करावी लागेल, अशी भीती पालिकेतील एका वरिष्ठ अधिका:याने व्यक्त केली़ (प्रतिनिधी)
 
च्मुंबईला दररोज 3,7क्क् दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो़ मध्य वैतरणा तलावाने मुंबईची पाण्याची क्षमता वाढविली़ मात्र आजही गळती व चोरीमुळे सुमारे 9क्क् दशलक्ष लीटरहून अधिक पाणीसाठा मुंबईकरांर्पयत पोहोचत नाही़ गळती शोधून जलवाहिनी दुरुस्ती व बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतले आह़े मात्र त्यानंतरही गळतीचे प्रमाण नेमके किती कमी झाले, याचा हिशेब पालिकेला अद्याप लागलेला नाही़ 
 
फसलेले प्रकल्प
अपु:या पावसामुळे 2क्1क् मध्ये मुंबईवर पाणीकपातीचे संकट कोसळले होत़े त्या वेळीस भविष्यात अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी  पालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केला होता़ समुद्राचे पाणी गोड करणो, सांडपाणी पुनप्र्रक्रिया प्रकल्प, पाणी बचत असे प्रकल्प पालिकेने हाती घेतले होत़े मात्र दररोज वाया जाणारे 2क् ते 25 टक्के पाणीही अद्याप पालिकेला वाचविता आलेले नाही़ 
अॅक्शन प्लॅन ठरवणार
सध्या जुलै अखेरीर्पयत पुरेल एवढा पाणीसाठा तलावांमध्ये आह़े त्यामुळे अद्याप पाणीकपातीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही़ आठवडाभरात तलावांमधील पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन अॅक्शन प्लॅन ठरविण्यात येणार असल्याचे जल विभागाचे उपप्रमुख अभियंता ए़ तवाडिया यांनी स्पष्ट केल़े
या विभागांत पाणी समस्या
पाणी वितरणाच्या टोकाला असलेल्या विभागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा अनेक वेळा होत असतो़ यामध्ये कुलाबा गीता नगर, कफ परेड, मलबार हिल, कुर्ला, विक्रोळी, भांडुप,  चेंबूर, गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द, वांद्रे, अंधेरी वर्सोवा, मालाड, बोरीवली, दहिसर या विभागांचा समावेश आह़े
 
पाण्याचा हिशोब
1 मुंबईत आजच्या घडीला दररोज 3,75क् दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आह़े यापैकी 3क् टक्के म्हणजे सरासरी 9क्क् दशलक्ष लीटर पाणीगळती व चोरीमुळे मुंबईकरांर्पयत पोहोचत नाही़ 
2 पिण्याचे पाणी व इतर वापरासाठी स्वतंत्र जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत़ त्यामुळे कपडे, लादी, भांडी, गाडी धुणो, बागकाम, शौचालयात 6क् टक्के पिण्याचे पाणी वाहून जात आह़े
 
आजघडीला तलावांमध्ये 
असलेला पाणीसाठा
(आकडेवारी दशलक्ष लीटरमध्ये)
तलावपाणीसाठापाणीसाठा
(2क्14)(2क्13)
मोडक सागर66,क्3क्46,371
तानसा17,65569,क्18
विहार3क्41क्,55क्
तुळशी2,5674,634
अप्पर वैतरणाक्5,49क्
भातसा6क्,9121,55,636