मुंबई : यंदाच्या मान्सूनमधील जून महिन्यातील सरासरी पाऊस सर्वात कमी असल्याने तलावांमध्ये पाण्याची स्थिती चिंताजनक झाली आह़े वैतरणात 38 दिवसांचा साठा शिल्लक आह़े त्यामुळे लवकरच मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट कोसळणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने आज दिल़े
स्थायी समितीच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी पाणीकपातीबाबत भीती व्यक्त केली़ दरवर्षी जून महिन्यात सरासरी 488 मि़मी़ पाऊस अपेक्षित असतो़ मात्र यंदा 13क् मि़मी़ म्हणजे जेमतेम 2क् टक्केच पाऊस झाला आह़े
वैतरणामध्ये 31 जुलै तर भातसा तलावामध्ये 15 जुलैर्पयतचा पाणीसाठा शिल्लक आह़े हवमान खात्याच्या भाकीतानुसार पुढच्या दोन महिन्यांत पाऊस कमी राहिल्यास परिस्थिती चिंताजनक होईल़ त्यामुळे येत्या तीन-चार दिवसांमध्ये पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे जलोटा यांनी स्पष्ट केल़े (प्रतिनिधी)
कृत्रिम पावसाला निविदा
पावसाने दडी मारल्यामुळे पालिका पुन्हा कृत्रिम पावसाकडे वळली आह़े खोटा पाऊस पाडण्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत़ मात्र या प्रयोगाच्या यशाबाबत पालिका साशंक आह़े
बचतीचे कोरडे आवाहन
2क्1क् मध्ये मुंबईवर पाणीकपातीचे संकट कोसळले होत़े त्या वेळी पालिकेने पाणी बचतीचे
अनेक प्रकल्प हाती घेतले होत़े
मात्र तीन वर्षानंतर पुन्हा तीच परिस्थिती ओढवली आह़े तरी पालिकेने परत बचतीचा राग आळवला आह़े
पाणीसाठय़ाची स्थिती
तलावकमाल आजचा किमान
मोडक 163़15154़96143़26
तानसा128़6312क़्35118़87
विहार8क़्1273़9373़92
तुळशी139़17134़2131़क्7
अ. वैतरणा6क्3़51595़55594़55
भातसा142़क्71क्9़191क्4़9क्