लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत जलवाहिनीच्या दुरुस्तीकामासाठी उपनगरातील अनेक भागात मंगळवारी पाणी कपात करण्यात आली आहे. पालिकेकडून पवई येथे तानसा (पूर्व) सागरी व ९०० मिमी व्यासाच्या जल झडप तसेच पवई उच्चस्तरीय जलाशय-१ इनलेटच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे २३ मार्च रोजी १२ तासांसाठी एस विभागातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहील. तर के/पूर्व, एच/पूर्व, जी/उत्तर विभागातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. दुरुस्तीचे काम २३ मार्च रोजी सकाळी १० ते रात्री १० या १२ तासांच्या कालावधीत करण्यात येणार आहे.
पवईतील जयभीम नगर, बेस्ट नगर, आरे रोड आणि परिसर, फिल्टर पाडा येथे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. अंधेरीतील चकाला, प्रकाशवाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत, चरतसिंग वसाहत, मुकुंद हॉस्पिटल, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, साग बाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र रामकृष्ण मंदिर रोड, जे. बी. नगर, बगरखा रोड, कांती नगर, (मरोळ बस बार क्षेत्र, केई ०१ ) येथील परिसरात दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी. ऍन्ड टी. कॉलनी, (साहर रोड क्षेत्र, केई ०१) येथे दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
अंधेरीतील विजय नगर, मिलिटरी मार्ग, वसंत ओएसिस, टाकपाडा, गावदेवी, मरोळगाव, चर्च मार्ग, हिल व्हिव सोसायटी, कदमवाडी येथे सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. मूळगाव डोंगरी, एमआयडीसी रोड क्रमांक १ ते २३, यशवंत नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. डीपी रोड, महाकाली नगर, बामण दयापाडा, इनकम टॅक्स कॉलनी येथे सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. सीप्झ, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वांद्रे टर्मिनल पुरवठा क्षेत्र येथे २४ तास कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
धारावीतील प्रेमनगर, नाईक नगर, धारावी लूप रोड येथे सकाळी ४ ते दुपारी १२ दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, ए.के.जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग येथे दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.