मुंबई - मानखुर्द लिंक रोड वरील चेडा नगर रोड वरील जय अंबे नगर वस्ती, मानखुर्द चीखकवडी आणि मानखुर्द महाराष्ट्र नगर मधील वस्त्यांमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले. तर काही कुटुंबियांची घरे गळत असल्याने दिशा ज्योत फाउंडेशन भर पावसात जावून तातडीने २०० कुटुंबीयांना प्लास्टिक ताडपत्री वितरण केली.
दिशा ज्योत फाउंडेशनच्या सदस्यांनी मुंबईच्या मानखुर्द आणि गोवंडी विभागातील सर्व वस्त्यांमध्ये भर पावसात जाऊन लोकांची विचारपूस केली. जे नागरिक नाल्याबाजुला राहत असणाऱ्या अश्या कुटुंबीयांना संस्थेच्या सदस्यांनी पालिकेशी संपर्क साधून नागरिकांना आधार केंद्र,शाळामध्ये सुखरूप शिफ्ट केले अशी माहिती या फाउंडेशनच्या अध्यक्ष ज्योती साठे यांनी दिली.
दिशा ज्योत फाउंडेशन मुंबईच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये शिक्षण, आरोग्य पोषक आहार, दीव्यांग सेवा, तृतीपंथी सेवा, महिला सक्षमीकरण, युथ संघटन, कौशल्य रोजगार या विविध विषयांवर कार्यरत असून मुंबई महाराष्ट्रात आपत्कालीन परिस्थितीत देखील आमची संस्था तत्पर उभी राहते अशी माहिती त्यांनी दिली.