मुंबईकरांना पाणी महाग; पाणीपट्टी सात टक्क्यांनी वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 09:44 AM2023-06-05T09:44:38+5:302023-06-05T09:45:00+5:30

महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांना आता पाणीपट्टीचाही सामना करावा लागणार आहे.

water expensive for mumbaikars water tariff increased by seven percent | मुंबईकरांना पाणी महाग; पाणीपट्टी सात टक्क्यांनी वाढवली

मुंबईकरांना पाणी महाग; पाणीपट्टी सात टक्क्यांनी वाढवली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांना आता पाणीपट्टीचाही सामना करावा लागणार आहे. पालिकेने १ हजार लिटर मागे ६ ते ७ टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती वापरासह व्यावसायिक वापरासाठी ही दरवाढ असून १६ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या बाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतून ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. या धरणातून मुंबईत पाणी आणण्याचा खर्च कोट्यवधींचा असून हा खर्च पाहता पालिकेने २०१२ साली दरवर्षी किमान ८ टक्के पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात पालिकेने पाणीपट्टी न वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०२१ मध्ये ५.२९ टक्के २०२२ मध्ये ७.१२ टक्के तर आता २०२३ मध्ये ६ ते ७ टक्के पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

२५ पैसे ते ४ रुपये वाढ

प्रति हजार लिटर मागे २५ पैसे ते ४ रुपयांची दरवाढ होणार असून आगामी मुंबई महापालिका निवडणूक  पाहता दरवाढीचा निर्णय होणार की दरवाढीच्या प्रस्तावाचा पुनर्विचार होणार, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

 

Web Title: water expensive for mumbaikars water tariff increased by seven percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.