जल, हवाईमार्गाने दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:06 AM2021-05-16T04:06:53+5:302021-05-16T04:06:53+5:30
जल, हवाई मार्गाने दाखल वैद्यकीय साहित्याला तत्काळ मंजुरी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जल आणि हवाई मार्गाने शनिवारी मुंबई ...
जल, हवाई मार्गाने दाखल वैद्यकीय साहित्याला तत्काळ मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जल आणि हवाई मार्गाने शनिवारी मुंबई महानगराच्या हद्दीत दाखल झालेल्या वैद्यकीय साहित्याला सीमाशुल्क विभागाने तत्काळ जकात मंजुरी दिली. त्यात द्रवरूप ऑक्सिजन, ऑक्सिजन सिलिंडर आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा समावेश आहे.
कुवेत येथून शनिवारी तीन वैद्यकीय द्रवरूप ऑक्सिजन टँकर आणि १ हजार ऑक्सिजन सिलिंडर जवाहरलाल नेहरू बंदरात दाखल झाले. न्हावा शेवा येथील सीमाशुल्क विभागाने १० मिनिटांच्या आत मंजुरी देत ही सामुग्री इंडियन रेडक्रॉस सोसायटीकडे सुपूर्द केली. त्याचप्रमाणे अमेरिकेहून मुंबई विमानतळावर शनिवारी रेमडेसिविरचा साठा दाखल झाला. गिलिएड सायन्स या कंपनीकडून आयात केलेली ही वैद्यकीय सामग्री क्लिनेरा ग्लोबल सर्व्हिसेसच्या मदतीने मुंबईत आणण्यात आली. या साहित्यालाही तत्काळ मंजुरी दिल्याचे सीमाशुल्क विभागाने सांगितले.
.........................................................