पाणीप्रश्नी महिलांचा आवाज बुलंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 11:51 PM2021-03-08T23:51:41+5:302021-03-08T23:54:11+5:30

जागतिक महिला दिनी ‘मजीप्रा’वर धडक : गढूळ पाणीपुरवठ्याविराेधात विचारला जाब

Water issues Women's voices are loud | पाणीप्रश्नी महिलांचा आवाज बुलंद

पाणीप्रश्नी महिलांचा आवाज बुलंद

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : बदलापुरातील चिकनपाडा परिसरातील नागरिकांना मागील दोन महिन्यांपासून अनियमित व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने वसाहतीतील २५ ते ३० संतप्त महिलांनी जागतिक महिला दिनीच गढूळ पाण्याच्या बाटल्या घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बदलापूर कार्यालयावर धडक दिली. 

लाखो रुपये मजीप्राला दिल्याने आमची एरंजाड चिकनपाडा येथील जुनी लाईन बिल्डरला दिल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला. त्यामुळेच बिल्डिंगमधील नागरिकांना मुबलक पाणी मिळते, मात्र आम्ही गाववाले असून, आम्हाला फक्त अर्धा तास आणि तेही गढूळ पाणी सोडले जात असल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला आहे. तसेच या गढूळ पाण्याच्या बाटल्या अधिकाऱ्यांना दाखवून हे पाणी तुम्ही तरी प्याल का? असा प्रश्न उपस्थित करून पाण्याबाबतच्या समस्या मांडल्या. गढूळ पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  ही समस्या त्वरित दूर करा, अन्यथा तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी कुसूम मेहेर, कविता मेहेर, सुषमा बोराडे, नयन बोराडे, सदानंद मेहेर, रूपेश मेहेर विष्णू वझे व इतर नागरिक होते.  

चिकनपाड्याला सोनिवली नाक्यावरून पाणी देत होतो. पावसाळ्यात ही लाईन चोकअप झाल्याने तात्पुरती लाईन एकविरा धाब्याजवळ क्राॅस कनेक्शन करून दिली होती. मात्र, रोड क्राॅसिंगची पाईपलाईन सारखी फुटत असल्याने मागील आठवड्यात बिडाची पाईप टाकत असताना अगोदरचे गढूळ पाणी त्यामध्ये पसरले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी गढूळ पाणी येत असेल, मात्र पुढील दोन दिवसांत त्यांची पाण्याची समस्या सोडवली जाईल.
    - सुहास मगदूम, डेप्युटी इंजिनीअर, मजीप्रा.

स्त्री म्हणजे गुलाबाचे रूप - डॉ. वैदेही दप्तरदार
nबदलापूर : स्त्री म्हणजे गुलाबाचे रूप आहे. जी काटे असूनही दुसऱ्याला सुगंध देण्याचे काम करीत असते. ‘वर्षभरात पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेता आले नसले तरी कोविड योद्ध्यांच्या रूपाने पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सर्वांनाच घराघरांत झाले, असे मत प्राचार्या डाॅ. वैदेही दप्तरदार यांनी व्यक्त केले. 
nजागतिक महिला दिनानिमित्त साेमवारी सकाळी ११ वाजता आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘महिला विकास मंच’ने कार्यक्रम आयोजित केला हाेता. याप्रसंगी बदलापूर शहरातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना मानपत्र, भेटवस्तू, रंगीबेरंगी रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. सहसचिव  पंढरीनाथ बाविस्कर यांनी मनाेगत व्यक्त करून सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या. 

nया वेळी सत्कारमूर्तींच्या वतीने डॉ. कल्पना शर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष जनार्दन घोरपडे व महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष उदय केळकर, सहसचिव पंढरीनाथ बाविस्कर उपस्थित होते. बदलापूरच्या होमियोपॅथी तज्ज्ञ कल्पना शर्मा, डॉ. सुर्वे आचार्य,  डॉ. मधुरा दळवी, कविता वाघमारे, माधुरी गोसावी, परिचारिका योगिता सुर्वे, बँकर दीपाली उमरेडकर, महिला पोलीस नाईक वर्षा कदम यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी आवर्जून उपस्थित होते. आभार  महिला विकास मंचच्या मानसी ओक यांनी मानले.

Web Title: Water issues Women's voices are loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.