जलवाहिन्यांलगत जॉगिंग, सायकल ट्रॅकचे कवच, अतिक्रमणांना प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 07:15 AM2017-11-29T07:15:43+5:302017-11-29T07:15:51+5:30

अतिक्रमणामुळे तानसा जलवाहिनीला धोका निर्माण झाला आहे. हे अतिक्रमण हटवले तरी परत नवीन झोपड्या तयार होतात. यामुळे अखेर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जलवाहिनीच्या दोन्ही बाजूला ‘जॉगिंग ट्रॅक’ व ‘सायकल ट्रॅक’ उभारण्यात येणार आहेत.

 Water junking jogging, cycle track armor, prohibition of encroachments | जलवाहिन्यांलगत जॉगिंग, सायकल ट्रॅकचे कवच, अतिक्रमणांना प्रतिबंध

जलवाहिन्यांलगत जॉगिंग, सायकल ट्रॅकचे कवच, अतिक्रमणांना प्रतिबंध

Next

मुंबई : अतिक्रमणामुळे तानसा जलवाहिनीला धोका निर्माण झाला आहे. हे अतिक्रमण हटवले तरी परत नवीन झोपड्या तयार होतात. यामुळे अखेर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जलवाहिनीच्या दोन्ही बाजूला ‘जॉगिंग ट्रॅक’ व ‘सायकल ट्रॅक’ उभारण्यात येणार आहेत. धारावी घाटकोपर आणि कुर्ला येथील जलवाहिन्या संरक्षक भिंतीने सुरक्षित केल्यानंतर तेथे जॉगिंग ट्रॅक व सायकल ट्रॅक तयार होण्याची शक्यता आहे. कारण याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
मुंबईच्या हद्दीत सुमारे ३९ किलोमीटर लांबीची तानसा जलवाहिनी आहे. या जलवाहिनीचा एक भाग हा मुलुंड ते धारावी असून दुसरा भाग हा घाटकोपर ते शीव असा आहे. जलवाहिनीच्या दुतर्फा असणाºया १०-१० मीटरच्या संरक्षित परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार नऊ प्रशासकीय विभागांपैकी टी, एस, एन, एम पश्चिम व जी उत्तर या पाच प्रशासकीय विभागांच्या हद्दीतील तानसा जलवाहिनीच्या परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विभागांतील अतिक्रमण हटविण्यासाठी ३० आॅक्टोबरपर्यंत मुदत होती.
तानसा जलवाहिनीच्या दुतर्फा असणारी १०-१० मीटरची जागा मोकळी झाल्यानंतर नवीन अतिक्रमण उभे राहू नये, यासाठी जलवाहिनीच्या दुतर्फा संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय यापूर्वीच महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याचबरोबर या जागेचा चांगला उपयोग होऊन परिसरातील नागरिकांनाही त्याचा फायदा व्हावा, यादृष्टीने आता या जागेत सायकल व जॉगिंग ट्रॅक उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी धारावी घाटकोपर आणि कुर्ला येथील जलवाहिन्यांजवळ संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे.

सायकल व जॉगिंग ट्रॅक याचा वापर करणे नागरिकांना सुलभ होण्याच्या दृष्टीने आवश्यक तेथे संरक्षक भिंतीला प्रवेशद्वारे ठेवण्यात येणार आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा होणाºया प्रमुख तानसा जलवाहिनीची सुमारे ३९ किलोमीटर लांबी लक्षात घेतल्यास प्रस्तावित ‘जॉगिंग ट्रॅक’ व ‘सायकल ट्रॅक’ हा उपलब्ध माहितीनुसार या प्रकारचा देशातील सर्वांत मोठा ट्रॅक असणार आहे.
जॉगिंग आणि सायकल ट्रॅकसाठी ३५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

संरक्षक भिंतीसाठी खर्च
घाटकोपर - आठ कोटी तीन लाख
कुर्ला - २९ कोटी २८ लाख
धारावी-माहीम - १८ कोटी ६७ लाख

Web Title:  Water junking jogging, cycle track armor, prohibition of encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.