Join us

भातसात साडेपाच घनमीटर पाणीसाठा वाढला

By admin | Published: July 03, 2016 1:54 AM

गेल्या २४ तासांतील मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. यात भातसा धरणात सर्वाधिक

ठाणे : गेल्या २४ तासांतील मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. यात भातसा धरणात सर्वाधिक साडेपाच दशलक्ष घनमीटर (दलघमी), तर बारवी, आंध्र धरणांत एक घनमीटर पाणीसाठा वाढला आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरी व ग्रामीण भागांच्या तुलनेत धरण क्षेत्रात या पावसाचे प्रमाण तसे कमीच आहे. मागील वर्षापेक्षा या धरणांत आजपर्यंत दुपटीने पाऊस कमी पडला आहे. पण, जो पडला तो धरण क्षेत्रात पडल्यामुळे धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. भातसा धरणात शुक्रवारपर्यंत २६०.४८ दलघमी पाणीसाठा होता, तो आता २६६.३२ दलघमी झाला आहे. उल्हास नदीला पाणी सोडणाऱ्या टाटा कंपनीच्या आंध्रा धरणातही १८.४५ ऐवजी आता १९.३७ दलघमी पाणीसाठा झाला आहे. बारवी धरणातही १६.४८ ऐवजी १७.०४ दलघमी पाणीसाठा तयार झाला आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणाच्या धामणी व कवडासमध्ये एक दलघमी पाणीसाठा वाढलेला आढळून आला आहे. तानसा आणि मोडकसागरमध्येही या प्रमाणातच पाणीसाठा वाढला आहे. (प्रतिनिधी) पाणीसाठा (दलघमी) व पाऊस (मिमी) धरणएकूण साठा आजचा साठापाऊस (मिमी)भातसा९४२.१०२६६.३२०६४ .००मोडक१२८.९३०१३.०३० ४८.६०तानसा१४५.०८०२३.४२०७०.६०बारवी१८०.०३०१७.०४०५६.००आंध्रा३३९.१४०१९.३७०४८.००धामणी२७६.३५७६.०७०९५.००कवडास०९.९६०९.९६०९५.००