Join us

मीरारोडच्या पालिका रुग्णालयातील पाणी यंत्र बंद 

By धीरज परब | Published: July 02, 2023 10:53 AM

मीरारोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स जवळ महापालिकेचे भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या मीरारोड येथील रुग्णालयात असलेली पिण्याच्या पाण्याची कुलर यंत्र बंद तर काही नादुरुस्त असल्याने रुग्ण , त्यांचे नातलग तसेच कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे . 

मीरारोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स जवळ महापालिकेचे भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय आहे. सदर रुग्णालयाच्या तळ , पहिला व दुसऱ्या मजल्यावर पालिकेने शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कुलर यंत्रे बसवलेली आहेत. रुग्णालयात दाखल व उपचारासाठी येणारे रुग्ण , त्यांचे नातलग , नागरिक तसेच कर्मचारी यांना सदर कुलर मुळे शुद्ध आणि थंड - साधे पिण्याचे पाणी मिळत असे. 

परंतु दुसऱ्या मजल्यावरील पाण्याचा कुलर अनेक दिवसांपासून बंद आहे . त्यामुळे दुसऱ्या मजल्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच सध्या नाही आहे . पहिल्या मजल्यावरील कुलर साठी जल जोडणी ज्या ठिकाणावरून घेतली आहे त्या वरून प्रश्न चिन्ह निर्माण केले जातेय. तर तळ मजल्यावरील कुलर मधून थंड पाणी येत नाहीच शिवाय सदर कुलर यंत्रांची नियमित देखभाल , स्वच्छता केली जात नसल्याचे आरोप होत आहेत .  

पिण्याचे पाणी शुद्ध नाही म्हणून अनेक कर्मचारी पासून नागरिक , रुग्ण आदींना बाहेरून पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागतात वा लगतच्या प्रभाग समिती कार्यालयातून पाणी घ्यावे लागते . सदर यंत्रे खरेदी प्रकरणासह त्याची खरेदी किंमत यावर सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित होत गैरप्रकाराचे आरोप केले जातात.

टॅग्स :मीरा रोड