Join us

जलवाहिनी फुटली, १५ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 12:25 PM

४ वर्ष उलटूनही दंड वसूल नाही

मुंबई  : मुंबई-ठाणे शहराला जोडणा-या लाल बहादूर शास्त्री मार्गावर जलवाहिनी फुटल्याप्रकरणी ठोठाविण्यात आलेला १५ लाख रुपयांचा दंड आजघडीला ४ वर्ष झाली तर मुंबई महापालिकेला कंत्राटदाराकडून वसूल करता आलेला नाही. २०१६ साली ही घटना घडली होती.

माहिती अधिकार कार्यकर्ते अंकुश कुराडे यांच्याकडील माहितीनुसार, लाल बहादूर शास्त्री मार्गावर शमशुद्दीन दर्गा परिसरात नाले रुंदीकरणाचे काम सुरु होते. यावेळी रुंदीकरणाच्या कामात १५ फेब्रूवारी २०१६ रोजी १५० मिली जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे पाणी वाया जाण्यासह जलवाहिनीचे देखील नुकसान झाले होते. वाया गेलेले पाणी आणि जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कारणात्सव कंत्राटदाराला १५ लाख रुपयांचा दंड ठोठविण्यात आला होता. विक्रोळी, भांडूप येथील कामाची बिले रोखून हा दंड करण्याबाबत पालिकेने स्पष्ट केले होते. कुराडे यांनी याबाबत महापालिकेकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागितली होती. मात्र प्राप्त माहितीमध्ये दंड वसूल करण्यात आलेला नाही, असे निदर्शनास आले, असे कुराडे यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, उर्वरित प्रकरणांत महापालिका मुंबईकरांकडून दंड वसूल करण्यात आघाडीवर असताना कंत्राटदारांबाबत हलगर्जीपण का? असाही सवाल केला जात आहे.  

टॅग्स :पाणीमुंबई महानगरपालिकामुंबई