बोरिवलीत जलवाहिनीचा 'स्फोट' ! पाण्याच्या वेगामुळे १२ वाहनांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 09:19 PM2018-03-27T21:19:03+5:302018-03-27T21:19:03+5:30

 बोरिवलीच्या चिकूवाडी परिसरात सोमवारी रात्री मोठा 'स्फोट' झाल्याचा आवाज झाला. काही वेळ नेमके काय झाले ते स्थानिकांना कळलेच नाही. त्यामुळे स्थानिकांची घाबरुन पळापळ सुरू झाली. बॉम्बब्लास्ट झाला अशा भीतीने आरडाओरडा करत धावपळ सुरू झाली. मात्र काही वेळातच

Water pipeline 'Explosion' In Borivli ! 12 vehicles damage due to water acceleration | बोरिवलीत जलवाहिनीचा 'स्फोट' ! पाण्याच्या वेगामुळे १२ वाहनांचे नुकसान

बोरिवलीत जलवाहिनीचा 'स्फोट' ! पाण्याच्या वेगामुळे १२ वाहनांचे नुकसान

googlenewsNext

 मुंबई - बोरिवलीच्या चिकूवाडी परिसरात सोमवारी रात्री मोठा 'स्फोट' झाल्याचा आवाज झाला. काही वेळ नेमके काय झाले ते स्थानिकांना कळलेच नाही. त्यामुळे स्थानिकांची घाबरुन पळापळ सुरू झाली. बॉम्बब्लास्ट झाला अशा भीतीने आरडाओरडा करत धावपळ सुरू झाली. मात्र काही वेळातच एक मोठी जलवाहिनी फुटल्याने हा आवाज झाल्याचे लोकांना समजले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र या सगळ्यात आसपासच्या दहा ते बारा गाड्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. 

सोमवारी जवळपास रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. बोरिवली पश्चिममध्ये असलेल्या चिकुवाडीच्या आर एम भट्टड रोडजवळ एक मोठी जलवाहिनी अचानक फुटली. जलवाहिनी फुटल्यानंतर त्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता, की आसपासच्या इमारतींच्या काचाना देखील यामुळे तडा गेला. त्यामुळे इमारतीमधील लोकही नेमके काय झाले हे पाहण्यासाठी बाहेर पडले. पाण्याचा दबाव वाढुन जवळच असलेली एक भींत कोसळली आणि या रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या रिक्षा, टेम्पो, कार आशा जवळपास दहा ते बारा वाहने एकमेकाला आदळून त्यांचेही नुकसान झाले. इतकेच नव्हे तर यामुळे पेव्हर ब्लॉक उखडले. तसेच त्याच्या जवळ असलेली झाडे देखील उन्मळून खाली पडली. साडे अकराच्या सुमारास याबाबत पालिका नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले. त्यानुसार पोलीस, आर मध्यच्या जलविभागाचे 'विशेष पथक' घटनास्थळी दाखल झाले. 'पाणी इतक्या वेगाने बाहेर येत होते, की त्यामुळे आसपासचा रस्ता खचतो की काय अशी भीती आम्हाला वाटू लागली', असे प्रत्यक्षदर्शी रोहित नाईक यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले. जवळपास २४ तास सतत पालिका कर्मचारी पाण्याची ही गळती थांबविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. त्यातच हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाल्याने कामात काही प्रमाणात अडथळा येत होता. त्यामुळे गर्दीला हटविण्याचे कामही त्यांना करावे लागत होते. मात्र अखेर दुसऱ्या दिवशी दुपारी ही गळती रोखण्यात पालिकेला यश मिळाले. मात्र यात हजारो लीटर पाणी वाहुन गेले. 

'दुष्काळात तेरावा महिना'
'गोराई तसेच बोरिवली परिसरात पाण्यासाठी वानवा करण्याची वेळ स्थानीकांवर आहे. त्यातच सोमवारी ही जलवाहिनी फुटल्याने गोराई - १,२,३ , जुनी एमएचबी कॉलनी, न्यु एमएचबी कॉलनी, धर्मानगर, योगीनगर आणि वझीरा नाका परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना पाणी येणार नसल्याचे आर/मध्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे', अशी माहिती माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांनी दिली.

Web Title: Water pipeline 'Explosion' In Borivli ! 12 vehicles damage due to water acceleration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.