Join us

गाेष्ट पाण्याची: मुंबईतील दोन कोटी नागरिकांना पाणी मिळते तरी कसे?

By सचिन लुंगसे | Published: January 23, 2023 6:18 AM

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून जिचा नावलौकिक आहे, अशी मुंबई महापालिका तब्बल दोन कोटींहून अधिक नागरिकांची तहान दररोज भागवत असते.

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून जिचा नावलौकिक आहे, अशी मुंबई महापालिका तब्बल दोन कोटींहून अधिक नागरिकांची तहान दररोज भागवत असते. सात धरणांतून येणाऱ्या पाण्यावर पिसे-पांजळापोळसह भांडूप येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करत ते शुद्ध केले जात असून, नंतर ते पुन्हा रिझर्व्हवायरमध्ये साठवत मुंबईकरांच्या घरोघरी पोहोचवले जाते. यासाठी महापालिकेचे हजारोंवर मनुष्यबळ काम करत असून, त्यांच्यामुळेच मुंबईकरांची तहान भागत आहे.

- १८६० साली देशातील पहिली नळ पाणीपुरवठा योजना मुंबईतल्या विहार तलावात सुरू झाली. - विहार हा सर्वात जुना तलाव असून, त्यातून मुंबईला पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली. भारतामधील ही पहिली नळ पाणीपुरवठा योजना आहे.- ८०,००,००० दररोज ८० लाख लोक मुंबईबाहेरून येतात त्यांना पाणी लागते. - दिल्ली : पाचजणांमागे एक नळ कनेक्शन, मुंबई : एका नळामागे वीस लोकांना पाणी १,३०,००,००० मुंबईची कागदोपत्री लोकसंख्या  मुंबई असे एकमेव शहर आहे ते तिच्या लोकसंख्येपेक्षा अधिक ८० लाख लोकसंख्येला लोकांना पाणी देते. ३,८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मुंबई महापालिका रोज करते. राज्यातील इतर छोट्या महापालिका अशा आहेत, त्यांचा वर्षाचा पाणीपुरवठा ८ हजार एमएलडी आहे. त्यांचा वर्षाचा पाणीपुरवठा आणि मुंबईचा दोन ते तीन दिवसांचा पाणीपुरवठा सारखा आहे.

मुंबईच्या मालकीची धरणे किती?- मुंबई व्यतिरिक्त इतर शहरांत पाण्याचे इतर स्रोत म्हणजे विहिरी, तलाव आहेत. मुंबईत पाण्याचा दुसरा स्त्रोत नाही. - मुंबईला एकूण सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. यातील पाच धरणे ही महापालिकेची स्वत:च्या मालकीची आहेत. यात मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी आणि मध्य वैतरणाचा समावेश आहे, तर अप्पर वैतरणा आणि भातसा ही दोन धरणे राज्य सरकारच्या मालकीची आहेत.- राज्य सरकारला धरणे बांधण्यासाठी महापालिकेने पैसा दिला आहे. यामुळे रॉयल्टीच्या स्वरूपात महापालिकेला अत्यंत कमी दराने राज्य सरकारकडून पाणी मिळते.

टॅग्स :पाणीमुंबई महानगरपालिका