पाणी प्रकल्प आठ वर्षे धूळ खात

By admin | Published: January 11, 2017 06:52 AM2017-01-11T06:52:07+5:302017-01-11T06:52:07+5:30

पाण्याची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत मिटविण्यासाठी पालिकेने जलप्रकल्प हाती घेतले. मात्र नियोजनाअभावी गेली आठ वर्षे गारगाई

The water project eats dust for eight years | पाणी प्रकल्प आठ वर्षे धूळ खात

पाणी प्रकल्प आठ वर्षे धूळ खात

Next

मुंबई : पाण्याची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत मिटविण्यासाठी पालिकेने जलप्रकल्प हाती घेतले. मात्र नियोजनाअभावी गेली आठ वर्षे गारगाई धरण प्रकल्प रखडला आहे. या दिरंगाईमुळे पाणी वितरणातील तफावत वाढत असल्याने किमान पुढील दोन वर्षांमध्ये या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा पालिकेचा निर्धार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाला आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजुरी मिळण्यासाठी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत झटपट मंजुरी देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मुंबईला दररोज ३ हजार ७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मात्र पाण्याची मागणी ४ हजार २०० दशलक्ष लीटर एवढी आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी नवीन धरणे बांधण्याची तयारी महापालिकेने सुरू केली. मात्र मध्य वैतरणा धरण उभारण्यासाठी एक तप लोटले. त्यानंतर आता गारगाई प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. गेली आठ वर्षे या प्रकल्पाचे कागदी घोडे नाचत आहेत. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. मात्र गेल्या आठ वर्षांत कामाला सुरुवातही झालेली नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व सरकारी परवानग्या व ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याची जबाबदारी सल्लागारावर सोपवण्यात येणार आहे. मात्र हा प्रकल्प नियोजित स्थळी उभा केल्यास येथील वन्य जीवन धोक्यात येईल, अशी भीती एका अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The water project eats dust for eight years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.