घाटकोपरमध्ये जल पुनर्प्रक्रिया प्रसाधनगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:07 AM2021-09-24T04:07:49+5:302021-09-24T04:07:49+5:30
मुंबई - घाटकोपर येथील देशातील पहिले आधुनिक दुमजली पाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्याची सुविधा असलेले प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. या प्रसाधनगृहात ...
मुंबई - घाटकोपर येथील देशातील पहिले आधुनिक दुमजली पाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्याची सुविधा असलेले प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. या प्रसाधनगृहात महिला, पुरुषांसाठी ३८ शौचकुपे असून वाॅशिंग मशीन, पिण्याचे पाणी, स्नानगृह आदींची व्यवस्था असणार आहे. वर्षभरात २० हजार नागरिकांना या प्रसाधनगृहाचा वापर करता येणार आहे.
घाटकोपर पश्चिम जगदुशानगरनजीक शिवस्फूर्ती मंडळ येथे उभारण्यात आलेल्या या आधुनिक प्रसाधनगृहाचे लोकार्पण आज, शुक्रवारी दुपारी १२ वाजता होणार आहे. अशा प्रकारच्या प्रसाधनगृहाचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे पाहणी करून अधिक माहिती घेण्यासाठी महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी या प्रसाधनगृहाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
* प्रसाधनगृहात महिला, पुरुषांसाठी ३८ शौचकूपे
* वाॅशिंग मशीन, स्नानगृह, शुद्ध पिण्याचे पाणी , पाण्याचा पुनर्वापर ‘सुविधा’ असणार आहे.
* वर्षभरात २० हजार नागरिकांना हे प्रसाधनगृह वापरता येणार आहे.
* पाण्याचा पुनर्वापर करून अंदाजे १० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे.