गॅस्ट्रो टाळण्यासाठी पाण्याच्या स्रोतांची तपासणी मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 02:04 AM2018-08-09T02:04:18+5:302018-08-09T02:04:30+5:30

मुंबईसह राज्यातील अन्य भागांतील लेप्टोच्या रुग्णांचे सर्वेक्षण करून, उपचाराबाबत मार्गदर्शक सूचना सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ठळकपणे लावाव्यात.

Water Rescue Campaign to Avoid Gastro | गॅस्ट्रो टाळण्यासाठी पाण्याच्या स्रोतांची तपासणी मोहीम

गॅस्ट्रो टाळण्यासाठी पाण्याच्या स्रोतांची तपासणी मोहीम

Next

मुंबई : मुंबईसह राज्यातील अन्य भागांतील लेप्टोच्या रुग्णांचे सर्वेक्षण करून, उपचाराबाबत मार्गदर्शक सूचना सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ठळकपणे लावाव्यात. औरंगाबाद व लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात स्वाइन फ्लू चाचणी प्रयोगशाळा सुरू कराव्यात. गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामीण भागातील पाण्याच्या स्रोतांची तपासणी करण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले.
मंत्रालयात साथ रोग नियंत्रण समितीची बैठक झाली. या वेळी लेप्टो, स्वाइन फ्लू, डेंग्यू, गॅस्ट्रो याबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. राज्यात या वर्षी १३६ जणांना लेप्टोची लागण झाली असून, त्यातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. २,१३४ डेंग्यूचे रुग्ण असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ४२ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून १० जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील एक लाख २८ हजार लोकांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस मोफत देण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रात आणि संपूर्ण राज्यात लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरण करावे, त्यासाठी नागरिकांमध्ये जणीवजागृती करावी, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. लातूर, औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात स्वाइन फ्लू चाचणी प्रयोगशाळा तातडीने सुरू करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांना दिले.

>प्रस्ताव केंद्राकडे पाठवला
स्वाइन फ्लू प्रतिबंध लसीकरणासाठी गरोदर मातांच्या तपासणीच्या प्रोटोकॉलमध्ये या लसीकरणाचा समावेश करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी केली. डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आॅगस्टमध्ये मोहीम सुरू करण्यात आली असून, राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थांना डेंग्यूबाबत जाणीवजागृती केली जाणार आहे.
१५ आॅगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. गॅस्ट्रोचा उद्रेक राज्यात २० ठिकाणी झाला असून, तो रोखण्यासाठी राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासणी मोहीम सुरू करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.

Web Title: Water Rescue Campaign to Avoid Gastro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.