जलसंपत्ती दिन : हे कसे...? राज्यात २० शहरांतील नागरिकांना मिळत नाही रोज पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 08:05 AM2023-04-24T08:05:23+5:302023-04-24T08:05:44+5:30
या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने हा सर्व्हे केला. फक्त १६ शहरांना दररोज पाणीपुरवठा, भविष्याच्या नियोजनात राज्यकर्ते नापास
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निम्म्याहून अधिक महाराष्ट्र कायम तहानलेला आहे. कारण राज्यातील जिल्हा मुख्यालयांच्या २० शहरांतील नागरिकांना पिण्याचे पाणी दररोज मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ चमूने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
६ शहरांतील नळांना तर ५ ते १२ दिवसांनी एकदाच पाणी येते. मराठवाड्यातील सर्वांत मोठे शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरातील लोकांची सहा दिवसांनी तर जालनाच्या नागरिकांची १२ दिवसांनी एकदाच नळाच्या पाण्याशी गाठभेट होते. १६ शहरे नशीबवान ठरली असून त्यांना कमीजास्त का होईना, पण दररोज पाणी मिळते. उन्हाळा तापू लागला आहे, तसे पाणीटंचाईचे चटकेही जाणवू लागले आहेत. यंदा राज्याच्या बहुतांश भागांत पुरेसे पाणी असतानाही लोकांना गरजेपुरते पाणीही दररोज मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने हा सर्व्हे केला.
किती दिवसांनी पाणीपुरवठा?
दररोज । १६ शहरे
गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिराेली, नाशिक, पुणे,
मुंबई, मुंबई उपनगर, अलिबाग, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर
२ ते ४ दिवस । १४ शहरे
वर्धा, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली,
नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सोलापूर.
५ ते ७ दिवस । ४ शहरे
वाशिम, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, धुळे.
८ ते १० दिवस । १ शहर : बीड
१० ते १२ दिवस । १ शहर : जालना
विभागांत काय स्थिती?
मराठवाडा : आठपैकी एकाही शहराला रोज पाणीपुरवठा होत नाही.
पश्चिम महाराष्ट्र : सोलापूर वगळता सर्व शहरांना दररोज पाणी मिळते. कोल्हापूर शहरात तर काही भागांना २४ तास पाणीपुरवठा होतो.
उत्तर महाराष्ट्र : नाशिक वगळता कुठेही दररोज पाणी मिळत नाही.
विदर्भ : अकरापैकी नागपूरसह
फक्त चार शहरे सुदैवी आहेत. त्यांना रोज पाणी मिळते.
कोकण : पाणीदार तर आहेच, नशीबवानही आहे. सर्व शहरांत
नळांना रोज पाणी येते.
याचा विचार कोण करणार?
शहराची २० वर्षांनंतरची संभाव्य लोकसंख्या आणि पाण्याची गरज.
जीर्ण पाइपलाइन बदलण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन पाणी वितरणाचे नियोजन.
‘टॉप टेन’
अडचणी
n सदोष वितरण व्यवस्था
n वारंवार
जलवाहिनी फुटणे
n सतत वीजपुरवठा खंडित होणे
n पाइपलाइन जीर्ण झाल्याने गळती
n अवैध नळजोडण्या
n नियोजनाचा अभाव
n वाढती थकबाकी
n अमृत योजनांची कासवगती
n पाण्याचा कोटा
वाढवला न जाणे
n मे महिन्यासाठी काटकसर