अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरीत पाणीबाणी; पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 12:48 PM2023-06-05T12:48:10+5:302023-06-05T12:48:18+5:30
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ५ जून रोजी सकाळी ८ पासून मध्यरात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अंधेरीच्या महाकाली गुंफा मार्गावरील ‘रम्य जीवन सोसायटी’जवळ, तसेच कार्डिनल ग्रेसियस मार्ग व बी. डी. सावंत मार्ग चौक येथे नवीन १५०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी आणि १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आउटलेट) जोडण्याचे काम उद्यापासून हाती घेण्यात येणार आहे, त्यामुळे सोमवारी के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा १६ तास बंद राहणार आहे.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ५ जून रोजी सकाळी ८ पासून मध्यरात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे त्रिपाठीनगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाउंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गानगर, मातोश्री क्लब, जोगेश्वरी (पूर्व) सारिपुतनगर, दुर्गानगर, विशाल हॉल, वर्मानगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बीमानगर, गुंदवली गावठाण पंथकी बाग, तेली गल्ली, कोलडोंगरी, जिवा महाले रोड, साईवाडी, जीवन विकास केंद्र मार्ग, अंधेरी (पूर्व) शिवाजीनगर, संभाजीनगर, हनुमान रोड, श्रद्धानंद रोड, नेहरू रोड, तेजपाल रोड, शास्त्रीनगर, राजेंद्र प्रसादनगर, आंबेडकरनगर, काजूवाडी, विले-पार्ले पूर्व, तसेच विले-पार्ले पूर्व डोमेस्टिक एअरपोर्ट, अमृतनगर, रामबाग, चकाला गावठाण, चकाला वजन काटा, अंधेरी पूर्व येथील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील, तर मोगरपाडा, नवीन नागरदास रोड, जुना नागरदास रोड, येथे पाणीपुरवठा कमी दाबाने येईल.
- मोरागाव, जुहू गावठाण, सांताक्रूझ (पूर्व) या भागातही पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
- या परिसरातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, तसेच कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.