पाणी योजना रखडल्या
By admin | Published: November 24, 2014 10:44 PM2014-11-24T22:44:55+5:302014-11-24T22:44:55+5:30
भारत निर्माण योजनेंतर्गत 2क्क्5-क्6 पासून रोहा तालुक्यातील अनेक पाणी योजनांना जिल्हा परिषदेकडून मंजुरी देण्यात आली आहे.
Next
मिलिंद अष्टीवकर ल्ल रोहा
भारत निर्माण योजनेंतर्गत 2क्क्5-क्6 पासून रोहा तालुक्यातील अनेक पाणी योजनांना जिल्हा परिषदेकडून मंजुरी देण्यात आली आहे. परंतु कुंडलिकेच्या पश्चिम खो:यातील अनेक गावांच्या पाणी योजना सहा ते सात वष्रे होवूनही पूर्णत्वास गेलेल्या नाहीत. परिणामी या गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. वर्षानुवष्रे रखडलेल्या या पाणी योजना दोन महिन्यात पूर्ण कराव्यात अशा सूचना आमदार पंडित पाटील यांनी दिल्या आहेत.
तालुक्यातील कुंडलिकेच्या पश्चिम भागात पारंगखार, कोकबन, शिळोशी, धोंडखार, गडबल, महादेवखार, वावेपोटगे, खैराळे बौद्धवाडी, टिटवी येथील पाणी योजनांना 2क्क्7-क्8 मध्ये मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे एक ते दोन वर्षात पूर्ण करावीत, असा शासन नियम आहे. मात्र सहा वष्रे होवूनही पाणी योजना पूर्णत्वास गेलेल्या नाहीत. यातील अनेक योजनांमधून लाखो रुपयांची उचल करण्यात आली आहे. काम प्रगतिपथात असल्याचे उत्तर अधिका:यांकडून देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी कामे वर्षानुवष्रे बंद असल्याचे उपस्थित ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. जानेवारीअखेरपासून अनेक गावांमधून पाणीटंचाईला सुरुवात होते. महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. अधिकारी वर्गाला जनतेच्या प्रश्नांची जाणीव नाही, असे मत या भागातील नागरिक करीत आहेत. ही सर्व कामे गाव समितीला करण्यासाठी देण्यात आली होती. गाव पुढा:यांनी केलेल्या सावळागोंधळामुळे ही कामे रखडली गेली असल्याचे संबंधित विभागाशी चर्चा केली असता समजले आहे. भविष्यातील पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी वर्षानुवष्रे रखडलेल्या पाणी योजना दोन महिन्यात पूर्ण कराव्यात असे आदेश वजा अल्टीमेटम आ. पंडित पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहे. यामुळे जनतेमध्ये समाधान आहे. परंतु लाखोंचा मलिदा खावून गब्बर झालेल्या गाव पुढा:यांवर कोणती कारवाई होणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
भारत निर्माण योजनेंतर्गत पाणी योजनांची कामे ही गाव समित्यांना देण्यात आलेली आहेत. त्यांनी ही कामे विहित मुदतीत पूर्ण केलेली नाहीत. ही कामे पूर्ण करावीत यासाठी या समित्यांना रीतसर पत्रे यापूर्वीच पाठविण्यात आलेली आहेत. या कामांची आम्ही प्रत्यक्ष पाहणी सुरू केली असून ज्या गाव समित्यांनी निधीची उचल करून कामे अर्धवट केलेली आहेत अशांवर सक्त कारवाई केली जाईल.
-एस. वी. वेंगुर्लेकर,
उपअभियंता, पंचायत समिती रोहा.