पनवेल शहरात पाणीटंचाई

By admin | Published: July 21, 2014 11:28 PM2014-07-21T23:28:37+5:302014-07-21T23:28:37+5:30

धो-धो पाऊस पडत असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मागणीप्रमाणो पाणीपुरवठा होत नसल्याने पनवेल शहराला गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई समस्या निर्माण झाली आहे.

Water shortage in Panvel | पनवेल शहरात पाणीटंचाई

पनवेल शहरात पाणीटंचाई

Next
पनवेल : धो-धो पाऊस पडत असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मागणीप्रमाणो पाणीपुरवठा होत नसल्याने पनवेल शहराला गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई समस्या निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संदर्भात पालिकेला निवेदन सादर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत लवकरच पाऊल उचलले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पनवेल नगरपालिकेच्या मालकीचे देहरंग धरण असून या ठिकाणी गाळ रूतल्याने साठवणुक क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे उन्हाळयात हे धरण कोरडे पडते. त्यामुळे या ठिकाणाहून पनवेल शहराला एप्रिल महिन्यार्पयत दररोज 12 एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. वास्तविक पाहता पनवेलची गरज दुप्पट आहे. म्हणून पालिका एमजेपी, एमआयडीसीकडून पाणी विकत घेऊन ते पनवेलकरांना पुरवले जाते. उन्हाळयात दरवर्षीप्रमाणो यंदाही देहरंग धरण कोरडे पडले होते. त्यामुळे गेली पाच महिने पालिका पाण्यासाठी पूर्णता एमजेपी आणि एमआयडीसीवर अवलंबून होती. पाण्यापोटी प्रशासनाला मोठी रक्कम या दोनही यंत्रणांना मोजावी लागली. पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला मोठी कसरत करावी लागत होती. मात्र सुदैवाने गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रत चांगला पाऊस झाल्याने देहरंग धरण भरले आहे. त्यामुळे या जलाशयातून 1क् एमएलडी पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाली आहे. त्याचबरोबर एमजेपीकडून 1क् आणि एमआयडीसीकडून 8 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येते. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मागणीप्रमाणो पाणी पुरवठा केला जात नाही. परिणामी उपलब्ध पाणी आणि मागणी यामध्ये प्रचंड तफावत निर्माण झाली असल्याने पनवेल शहरवाशीयांना नेहमीप्रमाणो सुरळीत पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून होत नाही. त्यामुळे गैरसोय आणि त्रस सहन करावा लागत असून या प्रश्नी मनसे आक्रमक झाली आहे. पालिकेच्या मालकीचे धरण असताना इतर ठिकाणाहून पाणी विकत का घ्यावे लागते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. धरणातील गाळ तसाच असून तो काढला का जात नाही यासारखे अनेक प्रश्न सिलकर यांना विचारण्यात येत  आहे. शहरवासीयांकडून पाणीपट्टी वसूल केली जाते तर त्यांना पुरेसे पाणी देण्याची जबाबदारीही पालिकेची असल्याचे निवेदन म्हटले आहे. 
 
एमजेपीचे तेच रडगाणो 
मनसेने दिलेल्या आंदोलनाची दखल घेत प्रभारी मुख्याधिकारी तथा प्रांताधिकारी सुदाम परदेशी यांनी सोमवारी पालिका आणि एमजेपीच्या अधिका:यांची बैठक बोलवली होती. पनवेलवाशीयांना पुरेसा पाणीपुरवठा का होत नाही असा सवाल परदेशी यांनी उभयतांना विचारला. त्यावेळी आम्हाला एमजेपीकडून पुरेसे पाणी मिळत नसल्याचे पालिकेच्या अधिका:यांकडून सांगण्यात आले. तर वीज नसल्याने त्याचबरोबर जलवाहिनी फुटल्याने आमच्याकडून मागणी प्रमाणो पाणीपुरवठा झाला नसल्याची कबुली देत एमजेपीच्या अधिका:यांनी नेहमीप्रमाणो टेप वाजवली. आता अडचणी दूर झाली असून मागणीप्रमाणो पालिकेला पाणी देऊ अशी ग्वाही एमजेपीने दिली आहे.

 

Web Title: Water shortage in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.