Join us

तलाव भरल्यानंतरही काही विभागांमध्ये पाणीटंचाई, शिवसेना नगरसेविकेची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 2:32 AM

तलाव क्षेत्रात या वर्षी जोरदार पाऊस झाला. मुुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९३ टक्के जलसाठा जमा झाला आहे.

मुंबई : तलाव क्षेत्रात या वर्षी जोरदार पाऊस झाला. मुुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९३ टक्के जलसाठा जमा झाला आहे. तरीही काही भागांमध्ये विशेषत: उपनगराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची तक्रार सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या नगरसेविकेने केली आहे. यापूर्वी कुलाबा येथील शिवसेनेच्या नगरसेविकेने तक्रार करीत स्वपक्षालाच घरचा अहेर दिला होता.गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे तलावांमध्ये १५ टक्के जलसाठा कमी जमा झाला़ नोव्हेंबर २०१८ पासून दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. तलावांमध्ये ५० टक्के जलसाठा जमा होताच गेल्या महिन्यात पाणीकपात रद्द करण्यात आली. तरीही पश्चिम उपनगरातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी केली.स्थायी समिती अध्यक्ष या नात्याने पालिका प्रशासनाला आदेश देऊन पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी गळ त्यांनी यशवंत जाधव यांना घातली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त आबासाहेब ज-हाड यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.शिवसेना नगरसेविकेने पाणीटंचाईबाबत तक्रार करण्याची ही पहिली वेळ नाही.कुलाबा येथील शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता सानप यांच्या विभागातही पाण्याची समस्या भीषण असल्याची तक्रार गेले काही महिने सुरू होती.पाण्याचे नियोजन तारेल संकटपावसाच्या पाण्यावरच मुंबईची मदार आहे. मात्र भविष्यात अपुºया पावसामुळे पाणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास पाण्याचे नियोजनच तारेल, असे मत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत व्यक्त केले. पावसाच्या पाण्याचे नियोजन केले तर भविष्यात पाणीटंचाईचे संकट मुंबईकरांना भेडसावणार नाही. यासाठी पालिकेने नियोजन करण्याचा प्रस्ताव सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी महासभेत मांडला. पावसाचे पाणी साठवायचे असेल तर प्रत्येक इमारतीमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे गरजेचे होते. विकासकांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याचे मान्य केल्यानंतर त्यांना परवानग्या देण्यात आल्या. पण त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. परिणामी पालिकेचे आणि मुंबईकरांचे त्यामुळे नुकसान झाल्याची नाराजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केली.

टॅग्स :पाणीमुंबई महानगरपालिका