पाणीटंचाई : उल्हासनगर महासभेत हंगामा
By admin | Published: March 22, 2015 10:33 PM2015-03-22T22:33:22+5:302015-03-22T22:33:22+5:30
गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्या विविध भागांत पाणीटंचाई निर्माण झाली
सदानंद नाईक ल्ल उल्हासनगर
गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्या विविध भागांत पाणीटंचाई निर्माण झाली असून पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांना नगरसेवकांनी महासभेत धारेवर धरले आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांत असंतोष निर्माण झाला असून नगरसेवकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
उल्हासनगर महापालिकेकडे स्वत:ची पाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत असून तिच्या मनमानीचा फटका शहरवासीयांना बसून त्यांना पाणीटंचाईला नेहमी सामोरे जावे लागत आहे. महासभेत जोपर्यंत पालिका आयुक्त बालाजी खतगावकर उपस्थित राहत नाहीत, तोपर्यंत पाणीसमस्या निकाली निघू शकत नसल्याचे कारण पुढे करून गेल्या दोन महासभा रद्द करून पुढे ढकलल्या आहेत.
गेल्या पालिका महासभेत माजी महापौर लीला अशान यांनी बैठे आंदोलन करून पाणीप्रश्नी
प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या आंदोलनानंतर एका आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिले होते. मात्र, पाणीटंचाईची समस्या सुटण्याऐवजी टंचाईचे लोण शहरात पसरले
असून विभागाविभागांत महिलांचे
मोर्चे निघत आहेत. या प्रकाराने पालिका पाणीपुरवठा विभाग वादात सापडला आहे.
तीन दिवस निर्माण झाली भीषण पाणीटंचाई
४आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होऊन गुरुवार, शुक्रवार, शनिवारी सलग तीन दिवस भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांनी दिली आहे.
४शहरातील सुभाष टेकडी परिसर, राहुलनगर, रेणुका सोसायटी, कुर्ला कॅम्प, प्रेमनगर टेकडी परिसर, महादेवनगर, गायकवाडपाडा, नेताजी चौक, ओटी सेक्शन - भीमनगर, संभाजी चौक, दहाचाळ, भरतनगर, गजानननगर आदी परिसरांत भीषण टंचाई निर्माण झाली आहे. २७८ कोटींची पाणीपुरवठा योजना जोपर्यंत कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत टंचाई कायम राहणार आहे.