मुंबई : महापालिका प्रशासनाने वर्षभरासाठी दहा टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर महिन्याभरातच मुंबईत पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी खणखणाºया नागरिकांच्या फोनने धडकी भरत आहे. मात्र तक्रारीनंतर एका प्रभागाचे पाणी दुसºया प्रभागाकडे वळवून अधिकारी आपला बचाव करीत आहेत, असा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी केला.महापालिकेने १५ नोव्हेंबरपासून मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र ही कपात अनेक विभागांमध्ये ५० टक्के एवढी आहे. दिवसेंदिवस परिस्थिती आणखी बिकट होत आहे. ठेकेदाराला मदत करण्यासाठी पाणीपुरवठा कमी होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. तर माझ्या घरातही पाणी येत नाही, अशी नाराजी बोरिवलीतील नगरसेवक विद्यार्थी सिंह यांनी व्यक्त केली. टँकर माफियांना फायदा मिळवून देण्यासाठी ही पाणीटंचाई निर्माण करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे मकरंद नार्वेकर यांनी केला. याबाबत खुलासा करताना तलाव क्षेत्रात वर्षभराच्या तुलनेत १५ टक्के कमी जलसाठा आहे. नगरसेवकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी शहर, पश्चिम व पूर्व उपनगरात जल अंभियंता खात्यामार्फत बैठक घेऊन पाणी समस्येचे तातडीने निवारण व दूरगामी नियोजन करण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण प्रमुख जल अंभियंता अशोक कुमार तवाडिया यांनी दिले. मात्र त्यांच्या उत्तरांनीही नगरसेवकांचे समाधान झाले नाही. अखेर यावर तात्काळ बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर नगरसेवकांनी काही दिवस संयम ठेवण्याची तयारी दर्शविली. गेल्या वर्षी १२ डिसेंबरला ११ लाख ७४ हजार १६६ दशलक्ष लिटर पाणीसाठी शिल्लक होता. मात्र, १२ डिसेंबर २०१८ रोजी नऊ लाख ५० हजार २१९ दशलक्ष लिटर पाणी साठा शिल्लक आहे.अशी भागतेय तहानअंधेरी-विलेपार्ले विभागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी लगतच्या विभागातील पाणी त्या ठिकाणी वळविण्यात आल्याची तक्रार भाजपाचे अभिजित सामंत यांनी केली. पाणीप्रश्न सुटेपर्यंत स्थायी समितीच्या बैठकीतच बसून राहण्याचा इशाराही त्यांनी दिला. अखेर त्यांच्या विभागाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी माघार घेतली.२४ तास नव्हे एक तासचवांद्रे आणि मुलुंड या दोन विभागात २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रयोग पालिका करीत आहे. २४ तास कसले एक तासही पाणी येत नाही, अशा तक्रारी येत असल्याचे काँग्रेस नगरसेवक आसिफ झकारिया यांनी सांगितले.
मुंबईत पाणीबाणीची स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 6:22 AM