पालिका तपासणार झोपडप्यातील पाणी
By admin | Published: June 29, 2014 10:50 PM2014-06-29T22:50:16+5:302014-06-30T00:09:56+5:30
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आता थेट झोपडप्यांमधील पाण्याचा दर्जा तपासण्याची मोहीम हाती घेणार आहेत.
मुंबई- मुंबई शहर आणि उपनगरात दूषित पाण्यामुळे होणारे वाढते आजार लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आता थेट झोपडप्यांमधील पाण्याचा दर्जा तपासण्याची मोहीम हाती घेणार आहेत. जुलै महिन्यापासून शहरातील झोपडपी असणार्या १० विभागांमध्ये ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
पाणी सुधारणा विकास अभियानांतर्गत पाण्याचा प्रभावी आणि समानस्तर पुरवठा करण्यात येत आहे. झोपडपीमध्ये पुरवठा होणार्या पाण्याची तपासणी करण्यात येणार आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी होणारा पाणी पुरवठा त्यातील कमतरता, सक्षमता आणि धोका आदी गोष्टी समजून घेण्यासाठी पालिकेच्या जल अभियंता विभागाने हाती घेतले आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये १० झोपडप्यांच्या विभागातील पाण्याची पहाणी करण्यात येणार आहे. यानंतर ३० झोपडप्यांच्या विभागातील पाण्याची पाहणी करण्यात येणार आहे. पाण्याची तपासणी करतानाच किती झोपडीधारकांकडे स्वतंत्र पाण्याची जोडणी आहे, याची देखील पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी झोपडपीमध्ये करण्यात येत असलेली अवैध पाणी जोडणी आणि पाणी चोरीची प्रकरणे पकडली जातील, असे जल अभियंता विभागातील अधिकार्यांचे म्हणणे आहे.