तलावांमध्ये दोन दिवसांत वाढला १६ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:06 AM2021-07-21T04:06:06+5:302021-07-21T04:06:06+5:30

मुंबई : मुसळधार पावसामुळे दोनच दिवसांत तलाव क्षेत्रातील चित्र पालटले आहे. रविवार रात्रीपासून जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने तब्बल दोन ...

Water storage in lakes increased by 16% in two days | तलावांमध्ये दोन दिवसांत वाढला १६ टक्के जलसाठा

तलावांमध्ये दोन दिवसांत वाढला १६ टक्के जलसाठा

Next

मुंबई : मुसळधार पावसामुळे दोनच दिवसांत तलाव क्षेत्रातील चित्र पालटले आहे. रविवार रात्रीपासून जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने तब्बल दोन लाख १७ हजार ९६८ दशलक्ष लिटर जलसाठा वाढवला आहे. ५७ दिवस पुरेल एवढा हा जलसाठा आहे. त्यामुळे पाणी संकट सध्या निवळले आहे.

गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. यामुळे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागले आहेत. गेल्या शनिवारपर्यंत तलावामध्ये दोन लाख ६२ हजार ८१५ दशलक्ष लिटर जलसाठा शिल्लक होता. मात्र विकेंडला ठाणे जिल्ह्यातील प्रमुख तलाव क्षेत्रातही पाऊस बरसल्याने दोनच दिवसांत मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिक जलसाठा जमा झाला आहे.

महापालिकेमार्फत दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक आहे. तलावात १७ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने पालिका प्रशासन पाणीकपातीच्या विचारात होते. मात्र मुसळधार पावसामुळे आता तलावांमध्ये चार लाख ८० हजार ७८३ दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे.

२० जुलै २०२१ रोजी

जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)

तलाव.. कमाल.. किमान ...उपायुक्त साठा (दशलक्ष) सध्या

मोडक सागर १६३.१५ १४३. २६ ७६७६९ १५६.५५

तानसा १२८.६३ ११८.८७ ८८५२५ १२५.४७

विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८.....८०.५९

तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ ..१३९.४८

अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९७.०२ ०००...५९३.३०

भातसा १४२.०७ १०४.९० २३०१६० ...१२०.४०

मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० ४९५८५ ..२५४. ७५

वर्ष.....जलसाठा (दशलक्ष लिटर)...टक्के

२०२१ - ४८०७८३

२०२० - ३९७६०७

२०१९- ७५११९७

Web Title: Water storage in lakes increased by 16% in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.