Join us

मुंबईसाठीचा पाणीसाठा वाढला

By admin | Published: July 23, 2015 2:24 AM

मोठ्या विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या पावसाने चाकरमानी मुंबईकरांची दैना उडविली असली तरी तलावक्षेत्रात कोसळधार कायम

मुंबई : मोठ्या विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या पावसाने चाकरमानी मुंबईकरांची दैना उडविली असली तरी तलावक्षेत्रात कोसळधार कायम असल्याने मुंबईच्या पाण्याची आणखी ४० दिवसांची सोय झाली आहे. गेल्या ४८ तासांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये एकूण ४० दिवसांचा जलसाठा जमा झाला आहे़ त्यामुळे पाणीकपात लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. निम्मा जुलै महिना कोरडा गेल्याने तलावातील पाणीसाठा घटला होता. त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट कोसळेल, असे संकेत पालिका प्रशासनाने दिले होते. परंतु सोमवार मध्यरात्रीपासून पावसाने तलाव क्षेत्रातही जोरदार हजेरी लावत आशेची किरणे दाखविले आहेत़ वर्षभर पाणीपुरवठ्यासाठी हा जलसाठा अपुरा आहे़ परंतु चार महिने मुंबईकरांना टेन्शनमुक्त ठेवण्यासाठी पुरेसा आहे़ (प्रतिनिधी)