मुंबई : रोजच्या रोज वेळेवर होणारा पाणीपुरवठा अचानक कमी झाल्याने गिरणगावकर हैराण झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. हा प्रकार मागील काही दिवसांपासून कायम असल्याने चिंचपोकळी, लालबाग, भायखळा, घोडपदेव आणि माझगाव परिसरातील नागरिक संतप्त आहेत. घरगुती नळांद्वारे येणाºया पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने महिलांना मोठ्या असुविधांना सामोरे जावे लागते; शिवाय पाण्याचा अन्य स्रोत नसल्याने मोठा मनस्ताप सहन करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.
गेल्या वर्षी झालेल्या अपुºया पावसामुळे तलावांमध्ये वर्षभरासाठी पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही. त्यामुळे पुढील वर्षी समाधानकारक पाऊस पडेपर्यंत मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यातच मुंबईकरांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागले आहेत, मे महिन्यात ही परिस्थिती अधिक भीषण होते आहे.
पाणीपुरवठ्याचा दाब कमी त्यातदेखील काही ठिकाणी अनियमितता असल्याने रात्री जागरण करून पाणी भरण्याची वेळ येथील नागरिकांवर येत आहे. अवेळी होणाºया पाणीपुरवठ्यामुळेदेखील अनेकांना त्रास सहन करावा लागतो. लालबाग, भायखळा आणि माझगाव परिसरांत बºयाच ठिकाणच्या चाळींमध्ये सकाळी किंवा रात्री एकाच वेळेस पाणी येते. त्यातच अत्यंत कमी दाबाने हा पुरवठा सुरू आहे. याविषयी महापालिका प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना दिली नसल्याने महिला वर्ग संतप्त झाला आहे. काही ठिकाणी चाळकऱ्यांनी एकत्र येत यावर तात्पुरता उपाय शोधत टँकर मागविले आहेत. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला ठरावीक भांडी पाणी भरण्याची मुभा दिली जात असून यासाठी स्वत:च्या खिशातले पैसे या चाळकºयांना भरावे लागत आहेत.गिरणगावातील काही इमारतींना पूर्वी पहाटेच्या सुमारास तब्बल दोन तास पाणीपुरवठा होत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सकाळी पावणेपाच ते सहा या वेळेमध्येच पाणीपुरवठा होत आहे. तसेच अत्यंत कमी दाबाने हा पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना अपुरे पाणी मिळत आहे. माणशी प्रतिदिन १३५ लीटर पाणी देण्याची घोषणा पालिकेने केली आहे. मात्र सध्या येथील रहिवाशांना माणशी प्रतिदिन अवघे ७०-९० लीटर पाणी मिळत आहे, अशी तक्रार स्थानिक रहिवासी नारायण चापके यांनी केली.
सातत्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची अनेकदा तक्रार केली. येणाºया अडचणींची माहिती देऊनही पालिकेचे अधिकारी, कर्मचारी लक्ष देत नाहीत. तक्रार दिल्यानंतर काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत होतो. नंतर परिस्थिती जैसे-थे होते. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.- सुनीता रणपिसे, गृहिणीगेली अनेक वर्षे जुन्या पाइपलाइनमधून येथे पाणीपुरवठा होत आहे. कदाचित कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याला ही पाइपलाइनही जबाबदार असू शकते. त्यामुळे ही समस्या मार्गी लावण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकावी लागणार आहे. यासाठी पालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे.- अंकुश जाधव, नोकरदारपिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त टँकर मागविला जातो, तो दिवसभर पुरत नाही. त्यामुळे धुणी-भांडी करण्याची कामे एक-दोन बादल्यांमध्ये करावी लागतात. ज्या घरांमध्ये लहान मुले आणि आजारी व्यक्ती आहेत, त्यांचा त्रास अधिक वाढला आहे.- काशीबाई चौघुले, गृहिणीशहरातील अन्य ठिकाणच्या पाणीटंचाईचा परिणाम गिरणगावात होत असल्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो आहे. अवेळी होत असलेल्या पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रोज तसेच नियमित पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणीदेखील आहे. पाण्याची समस्या निकाली काढणे गरजेचे आहे.- लीला घिमे, गृहिणी