Join us

भांडुप जलशुुद्धीकरण संकुलातील यंत्रणा पूर्वपदावर येण्‍यास सुरुवात, सायंकाळच्‍या सत्रातील पाणीपुरवठा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 9:36 PM

Mumbai Rain Update: भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे तसेच विद्युत पुुरवठा यंत्रणा बंद करावी लागली होती.

मुंबई : भांडुप जलशुुद्धीकरण संकुलातील नवीन आणि जुन्‍या अशा दोन्‍ही उदंचन केंद्रातील यंत्रणा टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने कार्यान्‍व‍ित होत असूून मुुंबईतील ज्‍या भागांना सायंकाळचा पाणीपुरवठा दिला जातो, त्‍या भागांना पाणीपुुरवठा टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने सुुरु करण्‍यात आला आहे.

    भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे तसेच विद्युत पुुरवठा यंत्रणा बंद करावी लागली होती. या कारणाने मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये आज (दिनांक १८ जुलै २०२१) सकाळपासून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला होता. भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरलेले पावसाचे पाणी अक्षरशः युद्ध पातळीवर उपसून गाळणी (filtration) व उदंचन (pumping) यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली . संबंधित संयंत्राची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्‍यात आली. यानंतर आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून उदंचन करणारे पंप टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने सुरु करण्‍यात येत आहेत. उदंचन सुुरु होताच भांडुप मुुख्‍य जलसंतुुलन (Main Reservoir) कुंभातील पाणीपातळी उंचावू लागली. त्‍यानंतर सायंकाळपासून पश्चिम उपनगरांसह शहर भागातील अनेक भागांमध्‍ये पाणीपुुरवठा देखील करण्‍यात आला आहे.

    यामध्‍ये प्रामुख्‍याने एच/पश्चिम विभागातील चॅपल रोड परिसर, खारदांडा, के/पूर्व भागातील मोगरापाडा, पार्ले पूूर्व परिसर, के/पश्चिम विभागातील यारी रोड, पी/उत्‍तर विभागातील मढ, गांधीनगर, पी/दक्षि‍ण विभागातील बिंबीसार परिसर, आर/दक्षिण वि‍भागातील ठाकूर संकूल, लोखंडवाला संकूल, आर/उत्‍तर विभागामध्‍ये दहिसर परिसर यासोबत शहर भागामध्‍ये जी/दक्षि‍ण विभागातील तुळशीपाईप मार्ग, सेनापती बापट मार्ग परिसर, एन. एम. जोशी मार्गावर दादर ते भायखळा दरम्‍यान, तसेच जी/उत्‍तर विभागात दादर, माहिम, धारावी, डी विभागात भुुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, महालक्ष्‍मी, ए विभागात कुलाबा, कफ परेड अशा निरनिराळ्या भागांमध्‍ये टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने पाणीपुरवठा देण्‍यात आला आहे/ देण्‍यात येत आहे.

    भांडुुप संकुलातील यंत्रणा टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने कार्यान्‍व‍ित होवून पाणीपुुरवठा पूूर्वपदावर येतो आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पुन्‍हा एकदा करण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटपाऊसपाणी