कुर्ल्यात मंगळवारी २० तास पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:07 AM2021-01-17T04:07:42+5:302021-01-17T04:07:42+5:30
मुंबई - पवई निम्नस्तरीय जलाशय येथील आऊटलेटवरील सहा ठिकाणी गळती लागल्याने मोठ्या दुरुस्तीचे काम मंगळवारी (दि. १९) हाती घेण्यात ...
मुंबई - पवई निम्नस्तरीय जलाशय येथील आऊटलेटवरील सहा ठिकाणी गळती लागल्याने मोठ्या दुरुस्तीचे काम मंगळवारी (दि. १९) हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते २० जानेवारी रोजी पहाटे चार वाजेपर्यंत कुर्ला भागात २० तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या विभागांत पाणीपुरवठा बंद...
या दुरुस्ती कालावधीत कुर्ला विभागातील प्रभाग क्रमांक १५६, १६१, १६२ व १६४ मधील, उदयनगर, मारवाह रस्ता दोन्ही बाजू, तेजपाल कंपाऊंड, टिळकनगर, अनिस कंपाऊंड, राजीवनगर, मिल्लतनगर, वायर गल्ली, संहिता संकुल, जरीमरी, सफेद पूल, सत्यानगर पाईपलाईन मार्ग, शांतीनगर, शिवाजीनगर, तानाजीनगर, खाडी क्रमांक ३, लालबहादूर शास्त्रीनगर या संपूर्ण परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. संबंधित परिसरातील नागरिकांनी या दुरुस्तीकामापूर्वी पुरेशा पाण्याचा साठा करावा, पाण्याचा काटकसरीने उपयोग करावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.