२४ ते २५ मे दरम्यान एन, एस आणि टी विभागात पाणीपुरवठा बंद

By जयंत होवाळ | Published: May 21, 2024 09:07 PM2024-05-21T21:07:26+5:302024-05-21T21:07:45+5:30

जलवाहिनी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता येथील उड्डाणपुलाच्या कामाच्या मध्ये येत असल्याने ती वळविणे गरजेचे आहे.

Water supply cut off in N, S and T sections from 24th to 25th May | २४ ते २५ मे दरम्यान एन, एस आणि टी विभागात पाणीपुरवठा बंद

२४ ते २५ मे दरम्यान एन, एस आणि टी विभागात पाणीपुरवठा बंद

मुंबई : महानगरपालिकेतर्फे गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प कामांतर्गत 'टी' विभागामध्ये फोर्टीस रुग्णालय ते उद्योग क्षेत्र पर्यंत गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यालगत अस्तित्वात असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे  २४ ते २५ मे दरम्यान २४ तासांसाठी एन, एस आणि टी विभागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता येथील उड्डाणपुलाच्या कामाच्या मध्ये येत असल्याने ती वळविणे गरजेचे आहे.

पालिकेतर्फे दोन ठिकाणी १२०० मिलीमीटर X १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम २४ मे रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून २५ मे रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.पुढील विभागात असेल  पाणी पुरवठा बंद -

एन विभाग - विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज रुग्णालय.

एस विभाग - नाहूर (पूर्व), भांडुप (पूर्व), कांजूर (पूर्व) चा  संपूर्ण परिसर, टागोर नगर संपूर्ण परिसर, कन्नमवार नगर विक्रोळी (पूर्व) येथील इमारत क्रमांक १ ते  ३२  व २०३ ते २१७
एस विभाग – मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (ऐशफोर्ड टॉवर, रुणवाल टॉवर, फोर्टिस रुग्णालय ते सोनापूर वाहतूक दिव्यापर्यंतचा परिसर), सीएट टायर मार्ग लगतचा परिसर (सुभाषनगर, एम. एम. आर. डी. वसाहत), गाव रोड, दत्त मंदीर मार्ग, अंजना इस्टेट, शास्त्री नगर, उषा नगर, लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (भांडुप पश्चिम), सोनापूर, गावदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग, लेक मार्ग, द्राक्ष बाग, काजू टेकडी, जनता मार्केट, टँक रोड परिसर, महाराष्ट्र नगर, कोकण नगर, सह्याद्री नगर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्ग लगतचा परिसर
टी विभाग – मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), जे. एन. मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी मार्ग (डम्पिंग रोड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, एम. जी. मार्ग, एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदन मोहन मालविय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुर गाव

Web Title: Water supply cut off in N, S and T sections from 24th to 25th May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई