Join us

मुंबईच्या एम पूर्व-पश्चिम वॉर्डांत उद्या पाणी नाही; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 9:48 AM

वाशीनाका येथे जलद्वार बसविण्यासाठी गुरुवारी (१३ जून) सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत एम पूर्व व एम पश्चिम विभागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मुंबई : वाशीनाका येथे जलद्वार बसविण्यासाठी गुरुवारी (१३ जून) सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत एम पूर्व व एम पश्चिम विभागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  बी. डी. पाटील मार्ग, वाशीनाका येथील गवाणपाडा, एच. पी. सी. एल. रिफायनरी भागांत पाणीपुरवठ्यातील दाबामध्ये सुधारणा करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत ७५० मिलिमीटर व्यासाचे जलद्वार बसविण्यात येणार आहे.

या परिसराचा पाणीपुरवठा बंद -

‘एम-पूर्व’ विभाग : लक्ष्मी वसाहत, राणे चाळ, नित्यानंद बाग, तोलाराम वसाहत, श्रीरामनगर, जे. जे. वाडी, शेठ हाइट्स, डोंगरे पार्क, टाटा वसाहत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बी. पी. सी. एल.) वसाहत, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, गवाणपाडा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा पॉवर थर्मल प्लांट, भाभा अणुसंशोधन केंद्र (बी. ए. आर. सी.), वरुण बेवरेजेस आदी. 

‘एम- पश्चिम’ :  माहुलगाव, आंबापाडा, जिजामातानगर, वाशी नाका, मैसूर वसाहत, खाडी मशीन, रामकृष्ण चेंबूरकर (आर. सी.) मार्ग, शहाजीनगर, कलेक्टर वसाहत, सिंधी वसाहत, लालडोंगर, सुभाषचंद्र बोसनगर, नवजीवन सोसायटी, ओल्ड बराक, चेंबूर छावणी, आदी.

टॅग्स :मुंबईनगर पालिकापाणीपाणी टंचाईजलवाहतूक