मुंबईतील पाणीपुरवठा उद्यापासून सुरळीत

By admin | Published: August 20, 2014 02:22 AM2014-08-20T02:22:22+5:302014-08-20T02:22:22+5:30

दहीहंडीच्या दिनीच ठाणो येथे फुटलेली तानसा जलवाहिनी आज तातडीने दुरुस्त करण्यात आली़ मात्र मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास गुरुवार उजाडणार आह़े

Water supply in Mumbai will start from tomorrow | मुंबईतील पाणीपुरवठा उद्यापासून सुरळीत

मुंबईतील पाणीपुरवठा उद्यापासून सुरळीत

Next
मुंबई : दहीहंडीच्या दिनीच ठाणो येथे फुटलेली तानसा जलवाहिनी आज तातडीने दुरुस्त करण्यात आली़ मात्र मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास गुरुवार उजाडणार आह़े त्यामुळे  मुंबईकरांना आणखी काही काळ कळ सोसावी लागणार आह़े
ठाणो येथील वर्तक नगरमध्ये 18क्क् मि़मी़ व्यासाची तानसा जलवाहिनी सोमवारी फुटली़ या जलवाहिनीतून लाखो लीटर पाणी वाहून गेल्यामुळे शहर व पश्चिम उपनगरात 25 टक्के तर पूर्व उपनगरात दहा टक्के कपात लागू करण्यात आली आह़े मात्र पालिकेच्या जल अभियंता खात्यातील पथकाने युद्धपातळीवर या जलवाहिनीची दुरुस्ती केली़ (प्रतिनिधी)
 
च्ही जलवाहिनी मोठी असल्याने पाण्याचा प्रवाह सुरू झाल्यानंतर दाब वाढण्यास आणखी काही कालावधी लागणार आह़े त्यामुळे दुरुस्तीनंतर पाणीकपात मागे घेतली तरी पाण्याचा दाब वाढेर्पयत काही वॉर्डाना झळ बसण्याबाबत विचारले असता, गुरुवार्पयत पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पालिकेचे उपायुक्त रमेश बांबळे यांनी स्पष्ट केल़े 
 
दुरुस्तीसाठी 8क् जणांचे पथक
च्वर्तकनगर आणि गुंदवलीची जलवाहिनी दुरुस्तीसाठी प्रत्येकी 4क् जणांचे पथक कार्यरत आहे.  हे काम युद्धपातळीवर करण्यात येत असून बुधवारी पहाटेपर्यन्त दुरुस्ती होण्याची अपेक्षा आहे. ते काम झाल्यानंतर पाण्याच्या दाबाचा अंदाज घेऊन बुधवारी दुपार पर्यन्त पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, (प्रचालने) आर. सी. माधवीया यांनी ‘लोकमत’ ला दिली.
 
च्वर्तकनगर आणि काल्हेरच्या गुंदवली परिसरात मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे ठाण्याच्या वर्तकनगर, शिवाईनगरात अनेकांना अक्षरश: पाणी विकत घ्यावे लागले.

 

Web Title: Water supply in Mumbai will start from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.