Join us  

वाडा पंचायत समितीला बैलगाडीने पाणीपुरवठा

By admin | Published: May 24, 2014 1:33 AM

तालुक्याचे पाण्याचे नियोजन करणार्‍या पंचायत समितीमध्येच तीव्र पाणीटंचाई असून कर्मचार्‍यांना व पंचायत समितीमध्ये येणार्‍या नागरिकांना पिण्यासाठी बैलगाडीतून प्रशासनाने पाणीपुरवठा सुरू केला आहे

वाडा : तालुक्याचे पाण्याचे नियोजन करणार्‍या पंचायत समितीमध्येच तीव्र पाणीटंचाई असून कर्मचार्‍यांना व पंचायत समितीमध्ये येणार्‍या नागरिकांना पिण्यासाठी बैलगाडीतून प्रशासनाने पाणीपुरवठा सुरू केला आहे. तालुक्यात भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले असून तालुक्यातील ७२ गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक गावपाडे टंचाईला तोंड देत असताना अधिकारी मात्र तालुक्यात पाणीटंचाई नाही, अशा फुशारक्या मारत असतानाच स्वत:वरच बैलगाडीने पाणी विकत घेऊन प्यावे लागत असल्याने टंचाईग्रस्त गावांना कसे काय पाणी मिळणार, असा यक्षप्रश्न तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांतील महिलांना पडला आहे. (वार्ताहर)