पाणीपुरवठ्याची वेळ बदलणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 05:07 AM2018-09-20T05:07:34+5:302018-09-20T05:08:10+5:30
मुंबई जलवितरण सुधारणा कार्यक्रमांतर्गत दाब नियंत्रण झडपा व अन्य कामे पूर्ण झाली असून प्रायोगिक तत्त्वावर पालिकेतर्फे चाचणी सुरू करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई जलवितरण सुधारणा कार्यक्रमांतर्गत दाब नियंत्रण झडपा व अन्य कामे पूर्ण झाली असून प्रायोगिक तत्त्वावर पालिकेतर्फे चाचणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे टी विभागातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल होणार आहे.
जलवितरण प्रयोगामुळे टी विभागातील मुलुंड पश्चिम व मुलुंड पूर्व भागात पाणीपुरवठ्याचा कालावधी वाढविण्याकरिता दाब नियंत्रण झडपा कार्यान्वित करण्याचे काम १८ ते ३० सप्टेंबरदरम्यान सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे या काळात मुलुंड पश्चिमेकेडील अमरनगर, राहुलनगर, न्यू राहुलनगर, शंकर टेकडी, हनुमान पाडा, मलबार हिल परिसर, स्वप्ननगरी, योगी हिल आणि इतर डोंगराळ भाग, मुलुंड कॉलनी, महानगरपालिकेच्या ट्रंक मेल व एल.बी.एस. मार्ग यामधील भाग, मुलुंड पूर्व येथील देशमुख गार्डन, नानेपाडा आणि मुलुंड रेल्वेलगतच्या भागातील वसाहती आदी ठिकाणच्या पाण्याची वेळ बदलली जाऊ शकते आणि पाण्याचा दाब कमी-जास्त होऊ शकतो. परिणामी, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.