पुढील २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा, पाणी उकळून पिण्याचे आवाहन

By सीमा महांगडे | Published: January 8, 2024 04:07 PM2024-01-08T16:07:59+5:302024-01-08T16:08:09+5:30

कांदिवली ते दहिसर भागात उद्या पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे.

Water supply with low pressure for the next 2 days appeal to boil water and drink | पुढील २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा, पाणी उकळून पिण्याचे आवाहन

पुढील २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा, पाणी उकळून पिण्याचे आवाहन

मुंबई:  कांदिवली ते दहिसर भागात उद्या पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आजच अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवावा लागणार आहे. दहिसरमधील पाणी पुरवठ्यावर जास्त परिणाम होणार आहे. तसेच पुढील दोन दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे.

बोरिवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक २ ची संरचनात्मक तपासणी मंगळवारी ९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत (एकूण आठ तास) होणार आहे. या कामादरम्यान, बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक २ रिक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या आर / दक्षिण, आर / मध्य व आर / उत्तर या विभागात म्हणजे कांदिवली, बोरिवली आणि दहिसर या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सोमवारीच पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा तसेच ९ जानेवारी रोजी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. पुढील दोन दिवस पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे, म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे असेही आवाहन पालिकेने केले आहे.

या परिसरांमध्ये होणार कमी दाबाने पुरवठा 

आर / दक्षिण - महिंद्रा आणि महिंद्रा, गुंदेचा ठाकूर गांव व  समता नगर-सरोवा संकुल,  कांदिवली (पूर्व). 

रोजच्या पाणीपुरवठ्याची वेळ - संध्याकाळी ६.२५ ते रात्री ८.२५
 
आर / मध्य  - ला-बेल्लेजा व ला-वेस्टा, बोरिवली (पूर्व). 

रोजच्या पाणीपुरवठ्याची वेळ संध्याकाळी ५.३० ते संध्याकाळी  ७.३०
 
आर / उत्तर –शिव वल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुती नगर, रावळपाडा, एन. जी. उद्यान, रिव्हर उद्यान, गावडे नगर, भोईर नगर, मिनी नगर, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, ज्ञानेश्वर नगर, कोकणीपाडा, संत नामदेव मार्ग, वाघदेवी नगर, केशव नगर,  राधाकृष्ण नगर, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, मेंदोडा कुंपण, भोईर कुंपण, सिद्धनाथ मिश्रा कुंपण, संत मीराबाई मार्ग, राज नगर, सुयोग नगर, वैशाली नगर, नरेंद्र संकुल, केतकीपाडा (अंशत:), एकता नगर, दहिसर टेलिफोन एक्स्चेंज, घरटनपाडा क्रमांक १ व २, गणेश मंदीर मार्ग, अष्टविनायक चाळ, दहिसर (पूर्व). 

रोजच्या पाणीपुरवठ्याची वेळ संध्याकाळी ४.४० ते ७.४०

  
आर / उत्तर –

आनंद नगर, आशीष संकुल, एन. एल. संकुल, वीर संभाजी नगर, भाबलीपाडा, पराग नगर, लिंक मार्ग, गोवण मार्ग,  छत्रपती शिवाजी महाराज संकुल, सुधींद्र नगर, देवयानी संकुल, महालक्ष्मी आणि सरस्वती संकुल, शक्ति नगर, सद्गुरू छाया लेऊट बंगाली पाडा, महाकाली वाडी, मातृछाया गल्ली, दहिसर भूयारी मार्ग, आनंद नगर (अंशत:), तरे कुंपण, अवधूत नगर, वर्धमान औद्योगिक परिसर, सी. एस. मार्ग, दहिसर पोलिस स्थानक परिसर, किसान नगर, वर्धमान औद्यगिक परिसर, डायमंड इंडस्ट्री, नॅशनल मील कुंपण, रामाणी कुंपण, केतकीपाडा ऑनलाईन पंपिंग, दहिसर (पूर्व).  रोजच्या पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८.४५ ते रात्री ११.३०)  

Web Title: Water supply with low pressure for the next 2 days appeal to boil water and drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.