पाणीबाणीत टँकर माफियांचा धंदा तेजीत; मुंबईतील १० टक्के कपातीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 02:12 AM2019-05-12T02:12:25+5:302019-05-12T02:12:38+5:30

पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील जलसाठ्यात दिवसेंदिवस घट वाढत असल्याने, पाणीटंचाईची झळ आता संपूर्ण शहराला बसू लागली आहे. मात्र, प्रत्येक विभाग कार्यालयासाठी एक याप्रमाणे २४ टँकर्स मुंबईत उपलब्ध आहेत.

Water tanker mafia boom; Tried to take advantage of 10% deduction in Mumbai | पाणीबाणीत टँकर माफियांचा धंदा तेजीत; मुंबईतील १० टक्के कपातीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न

पाणीबाणीत टँकर माफियांचा धंदा तेजीत; मुंबईतील १० टक्के कपातीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न

googlenewsNext

- शेफाली परब-पंडित

मुंबई : पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील जलसाठ्यात दिवसेंदिवस घट वाढत असल्याने, पाणीटंचाईची झळ आता संपूर्ण शहराला बसू लागली आहे. मात्र, प्रत्येक विभाग कार्यालयासाठी एक याप्रमाणे २४ टँकर्स मुंबईत उपलब्ध आहेत. यामुळे तहान भागविण्यासाठी अनेक विभागांमध्ये नागरिकांना खासगी टँकर्सवर अवलंबून राहावे लागत आहेत. नाममात्र दरामध्ये महापालिकेकडून मिळणारे पाणी दामदुप्पट रकमेत विकून टँकरमाफिया मात्र गब्बर झाले आहेत.
दरवर्षी १ आॅक्टोबर रोजी मुंबईत १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर्स जलसाठा असणे आवश्यक असते, परंतु या वर्षी नऊ टक्के जलसाठा कमी होता. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. महापालिकेने अद्याप पाणीकपातीमध्ये वाढ केलेली नाही, परंतु मुंबईतील अनेक भागांमध्ये रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मात्र, लोकवस्ती लाखोंची आणि टँकर दहा हजार लीटरचा अशी महापालिकेची सोय असल्याने हे पाणी कोणाची तहान भागविणार, अशी परिस्थिती आहे. त्यात काही ठिकाणी अधिकाऱ्यांचेही अभय मिळत असल्याने खासगी टँकर मालकांचे फावत आहे.
मुंबईकरांच्या या असहायतेचा फायदा उठवित टँकर माफियांचा धंदा तेजीत आहे. खासगी विहीर मालक, टँकर माफिया यांच्यामार्फत सुरू असलेली पाण्याची लूट गेल्या महिन्यात समोर आली. दक्षिण मुंबईत जवळपास ३० ठिकाणी अनधिकृतपणे पाण्याचा उपसा करून टँकर भरले जात असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी म्महापालिकेने खासगी विहीर मालकांची तक्रार शहर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे, तर परवाना नसताना अतिरिक्त पाणी उपसल्याप्रकरणी टँकर मालकांनादेखील नोटीस पाठविली आहे. हा प्रकार शहरात उघडकीस आला, तरी पूर्व आणि पश्चिम उपनगरातही अशी लूट राजरोस सुरू असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अशी सुरू आहे लूट...
एका लीटरसाठी अवघा एक पैसा मोजून टँकरमाफिया हेच पाणी राजरोस गरजू मुंबईकरांना एक रुपया प्रती लीटर या दराने विकत आहेत़ १० ते २० हजार लीटर पाण्यासाठी दक्षिण मुंबईत ६०० रुपये असलेला दर तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत पोहोचतो़, तर मध्य मुंबईत हाच दर १,६०० ते १,८०० असतो़ उपनगरांमध्ये १,३०० ते १,५०० रुपये आकारण्यात येतात़ पालिका आणि वाहतुकीसाठी थोडी चिरीमिरी द्यावी लागत असल्याने एवढा दर लावण्यात येतो, असे खासगी टँकर मालकांकडून सांगण्यात येते.

पाणीभरणा केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच
जलअभियंता विभागांतर्गत येणाºया सर्व टँकर जलभरणा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महापालिकेचे टँकर्स या ठिकाणी पाणी भरू शकतात. आवश्यकतेनुसार पाण्याची समस्या निर्माण झाल्यास खासगी सोसायट्यांनी आणलेल्या टँकरमध्ये या केंद्रावरून पाणी भरण्याची परवानगी देण्यात येते. १८ पैकी १६ केंद्रांवर नाइट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. यामध्ये टँकरचा वाहन नोंदणी क्रमांक, वाहनचालकाचा चेहराही कैद होतो, असे जल अभियंता खात्यातील अधिकाºयाने सांगितले.

एकाच टँकरवर कसे भागेल?
सव्वा कोटीच्या लोकसंख्येसाठी मुंबईत केवळ २४ टँकरची महापालिकेची व्यवस्था आहे. हा टँकर मागणीनुसार मिळत असला, तरी चाळींना प्राधान्य मिळते. खासगी सोसायट्यांमधील लोकांना पाण्यासाठी खासगी टँकर मागवावा लागतो. हे खासगी टँकर मालक दहा हजार लीटर पाण्यासाठी साडेतीन हजार रुपये आकारतात. त्यामुळे टँकरची संख्या वाढविणे आवश्यक आहे, असे मत अंधेरी येथील नगरसेवक अभिजित सामंत यांनी व्यक्त केले. बोरीवली पूर्व येथे पाण्यासाठी बोंब आहे, परंतु टँकर एकच असल्याने खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे स्थानिक नगरसेवक विद्यार्थी सिंह यांनी सांगितले.

Web Title: Water tanker mafia boom; Tried to take advantage of 10% deduction in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी