Join us  

रिमझिम सरींनी वाढवले पाण्याचे टेन्शन

By admin | Published: June 17, 2014 2:03 AM

पावसाला विलंब झाला तरी पाण्याचे टेन्शन नाही, असे पालिकेने उन्हाळ्यात जाहीर केले होते़

मुंबई : पावसाला विलंब झाला तरी पाण्याचे टेन्शन नाही, असे पालिकेने उन्हाळ्यात जाहीर केले होते़ परंतु उशिरा दाखल झालेला मान्सून आणि त्यानंतरही केवळ रिमझिमच सरी सुरू असल्याने चिंता वाढू लागली आहे़ मात्र तूर्तास पाणीकपात नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे़ गतवर्षी तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाला होता़ त्यामुळे १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा तलावांमध्ये असल्याने टेन्शन नसल्याचे पालिकेने काही महिन्यांपूर्वी स्पष्ट केले होते़ मात्र गतवर्षी आॅनटाइम असलेला मान्सून यंदा १५ जून रोजी दाखल झाला आहे़ तलाव क्षेत्रातही अद्याप पावसाने जोर धरलेला नाही़ परिणामी, तलावाच्या पातळीत घट होऊ लागली आहे़ गतवर्षी याच काळात तलावामध्ये १ लाख ७२ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा होता़ मात्र या वेळेस केवळ १ लाख ६८ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा तलावांमध्ये आहे़ तरीही अद्याप पाणीकपात करण्याची परिस्थिती आलेली नसून पालिकेची पावसावर मदार असल्याचे, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)