Join us

मुंबईत आता जल बोगदा; जलवाहिन्या फुटण्यावर पालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 9:55 AM

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या फुटण्यावर पर्याय म्हणून भूमिगत जलबोगद्याचा मार्ग पालिका प्रशासन शाेधत आहे.

मुंबई :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या फुटण्यावर पर्याय म्हणून भूमिगत जलबोगद्याचा मार्ग पालिका प्रशासन शाेधत आहे. शहर व उपनगरातील जीर्ण जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहेच. 

घाटकोपर- परेल आणि आणि घाटकोपर ट्रॉम्बे या जलबोगद्याचे काम सुरू असून येवई-कशेळी (ठाणे-बाळकुम) आणि मुलुंडदरम्यान २२ किमी लांबीचा जलबोगदा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या  या  प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू आहे. 

मुंबई जवळच्या तलावांची साठवण क्षमता ही १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. त्यातून  रोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.  पाणीपुरवठा करणाऱ्या  जलवाहिन्यांचे  सुमारे ३८० किलोमीटर अंतराचे जाळे आहे, तर ९० किलीटरचे भूमिगत जलवाहिन्यांचेही जाळे आहे. त्यांना विविध कामांचा फटका बसतो व  दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरठ्यात अडथळे निर्माण होतात.  त्यासाठी जल बोगद्यांचा पर्याय पुढे आला आहे. 

जलवाहिन्या फुटण्याच्या घटना :

 खासगी विकासकाकडून ठाण्यातील वागले इस्टेट येथील जलवाहिनीला फटका बसल्याने ती फुटली. ३ दशलक्ष लिटर पाणी वाया गेले आणि पालिकेला १३ काेटींचा फटका बसला.  

 नोव्हेंबर ३० - मेट्रो ६ च्या कंत्राटदाराकडून वेरावली जलाशयाची एक जलवाहिनी फुटल्याने जवळपास १ कोटी लिटर पाणी वाय लागेलच. शिवाय ५० तासांच्या दुरुस्ती कालावधी लागला.

 दहिसर येथे खासगी विकासकडून दुरुस्तीच्या कामादरम्यान ३०० मिमीच्या जलवाहिनीला फटका बसून ती फुटली.

टॅग्स :मुंबईनगर पालिका