तानसा धरणातून पाणीगळती; १३ वर्षे डागडुजी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 12:51 AM2018-11-03T00:51:01+5:302018-11-03T07:02:21+5:30

पाणबुडीच्या साहाय्याने गळतीच्या ठिकाणी करणार ‘मार्क’

Water turbidity from Tansa dam; There is no repair for 13 years | तानसा धरणातून पाणीगळती; १३ वर्षे डागडुजी नाही

तानसा धरणातून पाणीगळती; १३ वर्षे डागडुजी नाही

Next

मुंबई : अपुऱ्या पावसामुळे मुंबईत ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी मुंबईला पाणीपुरवठा करणाºया
प्रमुख धारणांपैकी एक असलेल्या तानसा धरणातील गळतीने अडचणीत भर पडली आहे. २००५ मध्ये शतक पूर्ण करणाऱ्या या धरणाची गेल्या १३ वर्षांमध्ये डागडुजी झालेली नाही. यामुळे धरणाच्या भिंतीतून पाणीगळती सुरू झाली आहे. ही गळती रोखण्यासाठी धरणाच्या भिंतीला अंतर्गत भागातून लवकरच मजबुतीकरण करण्यात येणार आहे.

सन १८९२ मध्ये तानसा धारण बांधण्यात आले. २००५ मध्ये एक मीटर उंची वाढवून धारण मजबूत करण्यात आले. त्यानंतर, धरणाच्या अपस्ट्रीम बाजूला असलेल्या वाळूच्या घनायटिंगवर गिलावा अथवा रंगकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे धरणाच्या दगडी भिंतीच्या पृष्ठभागावर असलेली वाळूची घनायटिंग खराब झाल्याने ठिकठिकणी पाणीगळती सुरू आहे. भिंतीच्या पृष्ठभागावर घनायटिंगला लहान-लहान तडे गेल्यामुळे पाणीगळती सुरू असली, तरी ती दिसून येत नाही. ही धक्कादायक बाब, धरण सुरक्षा संघटनेने पावसानंतर केलेल्या पाहणीनंतर महापालिकेच्या निदर्शनास आणली.

गळती रोखण्यासाठी करणार उपाययोजना
त्यानुसार, धरण पूर्ण भरल्यानंतर भिंतीवरील धरणाच्या अंतर्गत बाजूला पाणबुड्याच्या साहाय्याने चित्रीकरण करून, रंग व रिबनद्वारे चाचणी करून गळतीचे ठिकाण मार्क करण्यात येणार आहे. त्यानंतर, पाणीगळतीचे ठिकाण साफ करून ग्राउटिंगद्वारे धरणाच्या डाउनस्ट्रीम व अपस्ट्रीमला गळती बंद करणे, तसेच धरणातील पाण्याची पातळी काम झाल्यानंतर, अपस्ट्रीम अंतर्गत इपॉक्सी गिलावा दोन मीमी. जाडीचा थर धरणाच्या पूर्ण पातळीपासून तीन मीटर खाली व ५०० मीटर लांबीपर्यंत मजबुतीकरण करण्यात येणार आहे.

तानसा धरण हे चिरेबंद दगडी बांधकाम प्रकारचे आहे, धरणाची लांबी २,८३५ मीटर इतकी आहे. या धरणाची मजबूती व उंची वाढविण्याचे काम सन १९९२ ते २००५ पर्यंत चार टप्प्यात करण्यात आले. तानसा धरणाच्या बहिर्गामी विहिरीतून १,८००, २,७५० मीमी. व्यासाच्या तानसा जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो.

मुंबईला दररोज ३,८०० दशलक्ष लीटर्सएवढा पाणीपुरवठा करण्यात येतो. यापैकी तानसा धरणातून दररोज ४५५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असतो. धरणाच्या मजबुतीकरणाचे काम आठ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी महापालिका एक कोटी २४ लाख रुपये खर्च करणार आहे.

Web Title: Water turbidity from Tansa dam; There is no repair for 13 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.