श्रमिकांच्या ताेंडचे पळाले ‘पाणी’; पाणी विकत घेण्याची वेळ, मानखुर्द, मंडाला, अंधेरीतील रहिवाशांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 06:46 AM2021-03-26T06:46:25+5:302021-03-26T06:46:40+5:30

मुंबई :  महापालिका आपल्या अर्थसंकल्पातून विविध प्रकल्पांवर विशेषत: पाण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत असली तरी अजूनही मुंबईच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या ...

The ‘water’ of the workers ’tents; Time to buy water, Mankhurd, Mandala, the plight of the residents of Andheri | श्रमिकांच्या ताेंडचे पळाले ‘पाणी’; पाणी विकत घेण्याची वेळ, मानखुर्द, मंडाला, अंधेरीतील रहिवाशांची व्यथा

श्रमिकांच्या ताेंडचे पळाले ‘पाणी’; पाणी विकत घेण्याची वेळ, मानखुर्द, मंडाला, अंधेरीतील रहिवाशांची व्यथा

googlenewsNext

मुंबई :  महापालिका आपल्या अर्थसंकल्पातून विविध प्रकल्पांवर विशेषत: पाण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत असली तरी अजूनही मुंबईच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या वस्त्यांना विविध कारणे देत पाणी नाकारले जात आहे. अशा वस्त्यांमध्ये मुंबईला स्वच्छ ठेवणारा श्रमिक वास्तव्य करत असून, हा आकडा २० लाखांच्या आसपास आहे. या वस्त्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने या वस्त्यांमध्ये मुंबईच्या अनेक भागात ३० ते ३५ लीटरच्या पाण्याच्या कॅनसाठी १० ते १५ रुपये मोजावे लागत आहेत.‘सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रॉसी’कडून जागतिक जलदिनानिमित्त ‘मी असा भारत निर्माण करीन’चा ६वा अंक प्रकाशित करण्यात आला. 

यावेळी कार्यकर्त्यांकडून प्राप्त माहितीनुसार, आजही मुंबईत मानखुर्द, मंडाला, अंधेरी संघर्षनगर, कांदिवली क्रांतीनगर, बोरिवली 
राष्ट्रीय उद्यान आदिवासी पाडा, दहिसर गणपत पाटीलनगर, मालाड आंबेडकरनगर अशा असंघटित क्षेत्रातील वस्त्यांमध्ये नागरिकांसह रस्त्यांवर राहणाऱ्या बेघरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ३० ते ३५ लीटरच्या कॅनसाठी १० ते १५ रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईसारख्या प्रगत शहरात मालाड मालवणीमधील अंबोजवाडी वस्तीमध्ये १ ते २ किलोमीटरवरून सायकलवरून पाणी आणावे लागत आहे. १९९४ सालापासून येथील वस्ती वसली आहे. मात्र आजही परिस्थिती बदलेली नाही.

पाच घरांच्या एका नळजोडणीसाठी होतो ३५ हजारांचा खर्च   

  • मालाड, मालवणी, चेंबूर, गोवंडीसह मुंबईत नळ घ्यायचा असेल तर नागरिकांना गैरप्रकारांमुळे पाच घरांच्या एका नळजोडणीला ३५ हजार रुपये द्यावे लागत आहेत. 
  • महापालिकेने याकामी सरकारी प्लंबर नेमला आणि त्याने नळजोडणीच्या ठिकाणाचा सर्व्हे करत जोडणी दिली तर साहजिकच हा खर्च ३५ हजारांहून दहा हजार रुपयांवर येईन, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. 

वीस लाख श्रमिकांना नाकारले पाणी

मुंबई आजही वीस लाख श्रमिकांना पाणी नाकारते आहे. आणि हेच श्रमिक मुंबईला रोज स्वच्छ करण्यासाठी काम करत आहेत. यातील बहुतांश श्रमिक रेल्वे जमिनीवर, फुटपाथवर, वनविभागाच्या जमिनीवर, मिठागराच्या जमिनीवर राहात असून, त्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. - विशाल पुष्पा पद्माकर जाधव, कार्यकर्ते, सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रॉसी

Web Title: The ‘water’ of the workers ’tents; Time to buy water, Mankhurd, Mandala, the plight of the residents of Andheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी