गोरेगावच्या नागरी निवाऱ्याचा धबधबा ठरतो पर्यटकांचे आकर्षण
By मनोहर कुंभेजकर | Published: July 8, 2024 06:33 PM2024-07-08T18:33:07+5:302024-07-08T18:33:40+5:30
डोंगर व नागरी निवारा धबधबा वाचवण्यासाठी आंदोलन उभारण्याचे पर्याववरण प्रेमींचे आवाहन.
मनोहर कुंभेजकर, मुंबई-पावसाळा सुरू झाला की निसर्गाच्या सानिध्यात खळखळ वाहणाऱ्या झऱ्या धो धो वाहणारा धबधबा आणि हिरवीगार हिरवाईत भटकंती करायची ओढ निसर्गप्रेमींना लागते. गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा १ व २ समोरील डोंगरातील धबधबा काल पडलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा वाहू लागला आहे.
गोरेगाव (पूर्व) रेल्वे स्थानकावरून ३४६,६४६ बसने नागरी निवारा १ व २ च्या शेवटच्या स्टॉप वर उतरल्यावर समोर आणि म्हाडाच्या अथर्व इमारतीच्या मागील बाजूस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर उगम पावणाऱ्या वालभट नदीतून दरवर्षी पावसाळ्यात ओसंडून वाहणारा हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरतो.
वालभट नदीचे मुख्य उगमस्थान असलेला हा धबधबा आणि या धब्यावरून मुंबईचे सौंदर्य उंचावरून दिसते. स्थानिक विकाससकाने या परिसरात जाण्यासाठी चारही बाजूनी जाण्यासाठी वाट बंद केल्यामुळे आणि येथील जंगलात काँक्रीटीकरण होत असल्याने निसर्गप्रेमी पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.गेली अनेक वर्ष असून या धबध्याचा आनंद लुटण्यासाठी डोंगर चढून पर्यावरण निसर्गप्रेमी या धबधब्यावर पर्यटकांना जाता येत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
डोंगरा आडमोठ्या प्रमाणात उत्खनन व अवैध प्रकारचे कंट्रक्शन काम चालू आहे ते खालून दिसत नाही. परंतू विकासकाने सुरक्षा रक्षक नेमल्यामुळे वरती जाऊन पाहणी करता येत नाही. याकरिता मुद्दामून वृक्ष मोठे होऊ नये म्हणून दरवर्षी झाडे झुडपांची सरेआम कत्तल करून दि,३ डिसेंबर २०१८ साली या डोंगराला मोठी लागली होती आणि तीन तासांच्या प्रयत्नांनंतर येथील आग विझवण्यात आली, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
या डोंगराच्या उत्खलनामुळे भविष्यात रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शालवाडीसारखी दरड कोसळून या डोंगराच्या लगत असंलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतींना मोठा धोका पोहचू शकतो अशी भीती साद -प्रतिसाद संस्थेचे संस्थापक संदीप सावंत यांनी व्यक्त केली.
हा डोंगर आणि धबधबा नामशेष होण्याच्या मार्गावर असून एका विकासकाने येथे आयटी पार्कच उभारले असून यामध्ये अनेक कंपन्यांची आलिशान कार्यालये आहेत! वन्य प्राण्यांचा वावर या परिसरात दिसून येतो.मुंबईतील पर्यावरण प्रेमी याकडे लक्ष दिले पाहिजे. मुंबईकरांनी दिंडोशीचा डोंगर व नागरी निवारा धबधबा वाचवण्यासाठी मोठे आंदोलन उभारले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
मुंबईतील सर्वात जवळ असलेला धबधब्याचा आनंद आम्हाला घेता आला पाहिजे, निसर्गाच्या अनमोल निसर्ग रम्य हिरव्यागार डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्याचे जतन व्हायला पाहिजे असे येथील पर्यावरण प्रेमी नागरिक शरद मराठे यांनी सांगितले.