Join us

मराठवाड्यातील ‘वॉटरग्रिड’ योजना रद्द करणार नाही- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 4:07 AM

मराठवाड्यातील महत्त्वाकांक्षी वॉटरग्रिड योजना रद्द केली जाणार नाही. उलट गतीने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

मुंबई : मराठवाड्यातील महत्त्वाकांक्षी वॉटरग्रिड योजना रद्द केली जाणार नाही. उलट गतीने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद आणिलातूर जिल्ह्यातील वॉटरग्रिड प्रकल्पांबाबतचा प्रश्न विचारला होता. या योजनेसंदर्भात मराठवाड्यातील आमदारांची बैठक आपण अलिकडे घेतली आणि त्यातही तसेच आश्वस्त केले होते. या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागणार असून त्यासाठीची तजविजदेखील केली जाईल, असे पवार म्हणाले. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील वॉटरग्रिड प्रकल्पांसाठीच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी नवे सरकार ही योजना रद्द करायला निघाले आहे, अशी टीका केली.

टॅग्स :अजित पवार