किनाऱ्यावर धडकणार लाटा, चार दिवस उधाण! समुद्रात न जाण्याचे पालिकेने केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 12:51 PM2023-08-02T12:51:05+5:302023-08-02T12:52:18+5:30
फेसाळलेला समुद्र आणि वाहणारा सोसाट्याचा वारा झेलण्यासाठी मुंबईकर किनाऱ्यावर गर्दी करतात.
मुंबई : मुंबईकर सकाळ, संध्याकाळ समुद्रकिनारी फिरायला जातात. मात्र, पावसामुळे समुद्रालाही उधाण आले आहे. बुधवारपासून रविवारपर्यंत किनाऱ्यावर साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा धडकणार असून, समुद्रात न जाण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
फेसाळलेला समुद्र आणि वाहणारा सोसाट्याचा वारा झेलण्यासाठी मुंबईकर किनाऱ्यावर गर्दी करतात. पावसाळ्याच्या ऋतूतही मुंबईकर कुटुंबासह किनाऱ्यावर जातात. यात तरुणांची संख्यादेखील काही कमी नसते. बुधवारपासून शनिवारपर्यंत साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार असल्यामुळे मरिन ड्राइव्ह, वरळी, जुहूसह वेसावे, मार्वे, गोराई येथील समुद्रकिनारा रौद्ररूप धारण करणार आहे.
कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईकरांना सतर्क राहण्याचे तसेच समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन केले आहे.
हे आहेत भरतीचे दिवस
दिनांक वेळ लाटांची उंची
२ ऑगस्ट १२ः३० ४.७६ मीटर
३ ऑगस्ट १ः१४ ४.८७ मीटर
४ ऑगस्ट १ः५६ ४.८७ मीटर
५ ऑगस्ट २ः३८ ४.७६ मीटर
६ ऑगस्ट ३ः२० ४.५१ मीटर