पानकुट किल्ला नष्ट होण्याच्या मार्गावर
By admin | Published: July 16, 2014 12:50 AM2014-07-16T00:50:05+5:302014-07-16T00:50:05+5:30
केळवे समुद्रातील इतिहासकालीन जंजिरा किल्ला नष्ट होण्याच्या मार्गावर पुरातत्व विभाग व शासनाने पुढाकार घेऊन दुरूस्ती करावी अशी मागणी इतिहासप्रेमी आणि नागरीकांकडून होत आहे.
आशिष पाटील, केळवे-माहिम
केळवे समुद्रातील इतिहासकालीन जंजिरा किल्ला नष्ट होण्याच्या मार्गावर असून हा पुरातन वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व विभाग व शासनाने पुढाकार घेऊन दुरूस्ती करावी अशी मागणी इतिहासप्रेमी आणि नागरीकांकडून होत आहे.
केळवा समुद्रातील जंजीरा किल्ला हा मोठा ऐतिहासिक वारसा असून शिवाजी महाराज व पोर्तूगीज कालापासून नौदलाच्या निगराणीसाठी व परीसराच्या संरक्षणासाठी गेली अनेक शतके हा किल्ला समुद्रलाटाचा सामना करीत उभा आहे. मात्र आता या किल्ल्याचा बराचसा भाग कोसळत चालला असून वेळीच याकडे लक्ष न दिल्यास हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याची शक्यता आहे.
समुद्रात असलेल्या या जंजीरा किल्ल्याने शत्रुची अनेक आक्रमणे परतवुन लावल्याचा इतिहास आहे. आता या किल्ल्याला स्वसंरक्षणासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे.
इतिहास काळात संरक्षणासाठी महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या या किल्ल्याचे महत्व आजही कमी झालेले नाही. केळवे बीचवर येणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी आजही हा किल्ला मोठा आकर्षणाचा विषय आहे. मात्र ढासळत चाललेल्या या किल्ल्याच्या भिंती हा या सर्व पर्यटकांसाठी चिंतेचा विषय ठरतो. या ऐतिहासिक वारशाची पुरातत्व विभाग व शासनाच्या पर्यटन विभागाने जबाबदारी घेऊन डागडुजी करण्याची गरज आहे.