वाझेची डायरी, बारमालकाचा जबाब ठरला उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:05 AM2021-04-26T04:05:52+5:302021-04-26T04:05:52+5:30

हप्ते वसुली करत असल्याचे स्पष्ट; छाप्यात जप्त ऐवजाची छाननी सुरूजमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : माजी गृहमंत्री अनिल ...

Waze's diary, the bar owner's answer was useful | वाझेची डायरी, बारमालकाचा जबाब ठरला उपयुक्त

वाझेची डायरी, बारमालकाचा जबाब ठरला उपयुक्त

Next

हप्ते वसुली करत असल्याचे स्पष्ट; छाप्यात जप्त ऐवजाची छाननी सुरूजमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने केलेल्या कारवाईसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेकडे केलेला तपास महत्त्वपूर्ण ठरला. त्यांनी जप्त केलेली डायरी व बारमालक महेश शेट्टीच्या जबाबामुळे गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपाला पुष्टी मिळाली.

दरम्यान, शनिवारी (दि. २४) विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांतून जप्त केलेल्या ऐवजाची छाननी करण्यात येत आहे. डिजिटल आणि कागदपत्रांतून आरोपांच्या अनुषंगाने पुराव्याचा शोध घेण्यात येत आहे. आवश्यकता वाटल्यास देशमुख यांना मुंबईला बोलावून पुन्हा चौकशी केली जाईल, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, एनआयएने वाझेकडून जप्त केलेल्या डायरीत कोडवर्डमध्ये वसुलीच्या नोंदी असून एनआयएने मुंबईतील बारमालक महेश शेट्टी याची चौकशी केली होती. त्याने वाझेला एकूण एक कोटी ५५ लाख रुपये दिल्याची कबुली दिली होती. यावरुन हप्ता वसुली झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.

-------------------------------------

Web Title: Waze's diary, the bar owner's answer was useful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.