मुंबई : सर्व काही बाजारात, पैशातून विकत मिळते या वरकरणी खºया भासणाºया अनुभवामुळे व जीवनासाठी नव्हे तर जीवनशैलीसाठी लागणाºया अमाप वस्तूंच्या मायाजाळात अडकल्याने आपल्याला खरे जीवन देणाºया पृथ्वीचा सहज विसर पडत आहे, अशी खंत भारतीय पर्यावरण चळवळीचे निमंत्रक अॅड. गिरीश राऊत यांनी व्यक्त केली.जागतिक वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना अॅड. गिरीश राऊत यांनी सांगितले की, जागतिक हवामान संघटनेचा ६ नोव्हेंबर २०१७ चा अहवाल याची जाणीव करून देतो की, तापमानवाढ अपरिवर्तनीय झाली आहे.तापमान वाढत राहणार आहे. मानवजात व जीवसृष्टी या चालू शतकात नष्ट होणार आहे. कार्बन उत्सर्जन शून्य करण्याची व तो शोषणाºया जंगल, नदी आणि सागरातील हरितद्रव्याला वाढू देण्याची गरज आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगात तातडीने जनआंदोलन भारतातच नव्हे तर होण्याची गरज आहे.बदलत्या वातावरणाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात व देशातही एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस, गारांची वृष्टी, उष्णतेच्या लाटा, धुळीची वादळे होत आहेत. वीस ते तीस वर्षांपूर्वी कुणी अशी कल्पनादेखील केली नसती.आपण वर्षाला हजारो किलोमीटर लांब रस्ते व दर १० - १२ किलोमीटर अंतरावर प्रचंड बंदरांची मालिका करू इच्छितो. रिफायनºया, औष्णिक विद्युत, जैतापूर, मेट्रो-३ भुयारी रेल्वे, समृद्धी कॉरिडॉर, सागरी रस्ता, नवी मुंबई विमानतळ आणि देशातील अनेक प्रकल्प याला विकास म्हटले जाते. या विकासाला आता नकार द्यायला हवा. असा विकास झाला नाही तर नोकºया कशा मिळणार, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांनी काही वास्तव व मूलभूत सत्य समजून घ्यावे. आपण नोकरी करण्यासाठी जन्माला येत नाही. कृषियुगापासूनदुसºयाची ताबेदारी काही प्रमाणात सुरू झाली. वेठबिगारी, गुलामी अशा वाईट प्रथाही होत्या. त्या घालवण्याचे प्रयत्न झाले. आजही चालू आहेत.पण आजची प्रतिष्ठित व हवीशी वाटणारी नोकरी ही औद्योगिक शहरी व्यवस्थेची निर्मिती आहे. या जीवनपद्धतीत आपण आपल्याला प्राणवायू, पाणी व अन्न देऊन खºया अर्थाने जगवणाºया पृथ्वीच्या नैसर्गिक पद्धतीपासून दूर जातो. एवढेच नाही तर आपल्या नकळत तिच्या विरोधात वागू लागतो, असेही राऊत यांनी सांगितले.* आॅस्ट्रेलियात वातावरणातील आत्यंतिक उष्णतेमुळे पानांतील ओलावा शोषला जात आहे.* शुष्क पाने जळाल्याने वणवे लागत आहेत.* सूर्य उत्तरेकडे असताना दक्षिण ध्रुवाजवळील भागात हे घडत आहे ही चिंतेची बाब आहे.* सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेल्या व त्यामुळे प्रगत म्हणून ओळखल्या जाणाºया महाराष्ट्रात त्याचा परिणाम म्हणून ४४ टक्के वाळवंटीकरण झाले आहे.* बीड, लातूर, उस्मानाबादसारख्या ठिकाणी पाणी ८०० ते १५०० फूट खोल गेलेआहे.* कोकणातही काही भागांत पाणी १५०-२०० फूट खाली गेले आहे.
खरे जीवन देणाऱ्या पृथ्वीचाच आपल्याला विसर पडतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 2:17 AM