Join us

आम्ही व्यसनमुक्तीचे दूत; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 3:36 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यसनमुक्तीच्या विचारांच्या प्रचारासाठी व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धा शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी व संस्था संघटनांच्या उस्फुर्त सहभागाने पार पडली.

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यसनमुक्तीच्या विचारांच्या प्रचारासाठी व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धा शाळा, महाविद्यालयीनविद्यार्थी व संस्था संघटनांच्या उस्फुर्त सहभागाने पार पडली. व्यसनांच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर विरोधी मताचे होते. सरकारने व्यसनमुक्तीची कास धरावी याकरिता त्यांनी भारतीय संविधानात कलम ४७ च्या माध्यमातून खास तरतूद केली. व्यसनांना आळा घालणे तसेच व्यसनी व्यक्तींचे मतपरिवर्तन करुन त्यांना निर्व्यसनी बनविणे हे  नशाबंदी मंडाळाचे उद्दिष्ट साध्य व्हावे आणि युवकांपुढे तसेच सर्वसामान्य समाजापुढे व्यसनमुक्तीचा संदेश जावा याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य च्या वतीने व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धा सोमवारी दुपारी ०१.०० वाजता मुंबई शहराचे मा. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आणि जितेंद्र भोपळे यांच्या हस्ते उद्घाटन करुन सुरुवात करण्यात आली.

स्पर्धेत गुरुकुल महाविद्यालय, वालिया महाविद्यालय, डी. जी. रुपारेल महाविद्यालय, सिध्दार्थ महाविद्यालय आनंद भवन व बुध्द भवन, निर्मला निकेतन काँलेज आँफ सोशल वर्क चर्चगेट,राँयल महाविद्यालय, ठाकूर महाविद्यालय, एस के सोमैय्या महाविद्यालय, ना. ग. आचार्य महाविद्यालय, किर्ती महाविद्यालय, दालमिया महाविद्यालय, Radav महाविद्यालय, SST महाविद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठ, नांदेड, लक्ष्मण देवराम महाविद्यालय, जि. प. शाळा वसार, आंबरनाथ, जि. प. मराठी केंद्रशाळा, बोळींज, वसई, जिवनधारा संस्था, अभिनव कला मंच, युवा संस्था, ब्रम्हकुमारीज गावदेवी व विक्रोळी, युगंधरा वस्ती स्तर, ओरियन्टल महाविद्यालय, विद्यालंकार महाविद्यालय ई नी सहभाग घेऊन व्यसनमुक्ती विषयांवर समस्यांचा उल्लेख कमी सांगत जास्तीत जास्त उपाययोजना मांडण्यावर भर दिला व त्याची अमलबजावणी करुन व्यसनमुक्तीसाठी प्रयत्नशिल राहण्याचा संदेश मुंबईकरांना दिला.

सदर स्पर्धेचे परिक्षण तात्या फेम बाळुमामाच्या नावानं चांगभलं मा. अक्षयजी टाक व अभिनेते पथनाट्य व दिग्दर्शक मा. संदेशजी लाळगे यांनी केले. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक लक्ष्मण देवराम सोनावणे महाविद्यालय, कल्याण, व्दितीय क्रमांक डी. जी. रुपारेल महाविद्यालय, माटुंगा तृतीय क्रमांक निर्मला निकेतन काँलेज आँफ सोशल वर्क, चर्चगेट यांनी मिळवली. तर स्पर्धेत कै. कृष्णकांत साळेकर बुलंद आवाज पुरस्कार कु. आयुष रस्तोगी यांना देण्यात आला. स्पर्धेच्या शेवटी परिक्षकांनी पारितोषिक मिळालेल्या स्पर्धकांची नावे जाहीर केली व समारोप प्रसंगी परिक्षक मा. अक्षयजी टाक यांच्या हस्ते उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. 

 स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा ०६ डिसेंबर २०१९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित भव्य पोस्टर्स प्रदर्शनी कार्यक्रमात शिवाजीपार्क येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असुन पारितोषिक मिळालेले स्पर्धक शिवाजीपार्क येथे सादरीकरण करुन व्यसनमुक्तीचा प्रचार करणार आहेत. तसेच वर्षभर ही पथनाट्ये संपुर्ण मुंबईत सादरीकरण करुन प्रचार, प्रसार करणार असल्याची माहीती मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी दिली आहे.

टॅग्स :विद्यार्थीडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमहाविद्यालय