Join us

दुर्घटना घडल्यास आम्ही जबाबदार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 2:11 AM

वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील धोकादायक इमारतीचे कारण पुढे करत येथील इमारती रिकाम्या कराव्यात, दुर्घटना घडल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहणार नाही

मुंबई : वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील धोकादायक इमारतीचे कारण पुढे करत येथील इमारती रिकाम्या कराव्यात, दुर्घटना घडल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहणार नाही, अशी नोटीस साबां खात्याने काढली आहे. त्यामुळे रहिवासी संतप्त झाले आहेत.माफक दरात मालकी हक्काच्या घरांसाठी आम्ही एक महिना वाट पाहणार आहोत. घरे मिळाली नाहीत तर सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल. याचा पहिला टप्पा म्हणून २९ एप्रिल रोजी शासकीय वसाहतीतील महिलावर्ग मूक मोर्चा काढणार आहेत, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.या शासकीय वसाहतीमधील इमारती मोडकळीस आल्या असून शासकीय वसाहतीचा पुनर्विकास करून येथील कर्मचाऱ्यांना व अधिकाºयांना माफक दरात मालकी हक्काची घरे मिळावी, या मागणीसाठी रहिवासी अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रयत्न करत आहेत. यावर शासनाने पुनर्विकासासाठी भूखंड देण्याचे आश्वासन दिले; परंतु आश्वासनाची पूर्तता झाली नाही. आता येथे छत कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.