Join us

"आम्ही जनतेचे प्रश्न मांडतोय, त्याला विशिष्ट रंग देण्याची गरज नाही"; जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 12:25 PM

Jayant Patil : आमदार जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Jayant Patil On Ajit Pawar ( Marathi News ) : राज्यात काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील. दरम्यान, सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 'जनसन्मान यात्रा' सुरू केली आहे. दिंडोरीमधून या यात्रेला सुरूवात झाली आहे. दरम्यान, या यात्रेत गुलाबी रंगाची बस वापरण्यात आली. या कलरवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रंगावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. 

"महाराष्ट्रातही वक्फ घोटाळा, जमिनी लाटण्यासाठी... "; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेस नेत्यांवर आरोप

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही आजपासून शिवस्वराज्य यात्रा सुरु करत आहे. महाराष्ट्रातील सरकारने गोंधळ सुरू केल्याचं दाखवण्याच काम ही यात्रा करेल. ही यात्रा राज्यभर जाईल. लोकसभेत महाराष्ट्रातील जनतेने कौल दिलाय. लोकसभेनंतर आता अधिकचा उत्साह दिसतोय. साधेपणाने आम्ही जनतेच्या मनाला भिडणार आहे. आम्ही जनतेचे रंग घेऊन निघालो आहे, जनतेच्या मनातील, जनतेच्या विश्वासातील रंग आहे. त्यात विश्वास आहे. जनतेत समरुप होण्याची आमची यात्रा आहे. आमच्या यात्रेला विशिष्ट रंग देण्याची गरज नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला. जनता आमच्या मागे आहे, आमची साधी यात्रा लोकांच्या मनाला स्पर्श करेल, असंही जयंत पाटील म्हणाले.

"उद्धव ठाकरे पहिल्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री होते. ते दिल्लीला जाऊन आले याचे आम्हाला समाधान आहे. आम्ही येणाऱ्या निवडणुका एकत्र लढणार आहे, असंही जयंत पाटील म्हणाले. 

'अमोल मिटकरी आमच्या बरोबर नाहीत याची खंत'

यावेळी जयंत पाटील यांना शिवस्वराज्य यात्रेत जुने सहकारी नाहीत याची खंत वाटते का? असा सवाल पत्रकारांनी केला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, मला एक खंत आहे, अमोल मिटकरी आमच्याबरोबर असायचेत ते आता नाहीत, याची मला खंत वाटत आहे. ते नेहमी आमच्यासोबत असायचे, असंही पाटील म्हणाले. मिटकरी यांच्यासह आणखी बरेच सहकारी आमच्यासोबत नाहीत, याचीही खंत आहे. महाराष्ट्र गुजरातपेक्षाही खाली गेलाय. याचीही खंत आहे, असा निशाणाही पाटील यांनी साधला.  

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार