आम्ही दत्तकाच्या जोरावर घर चालवत नाही; मुख्यमंत्र्यांवर शरद पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 05:27 AM2018-12-08T05:27:45+5:302018-12-08T05:28:16+5:30

नाशिक जिल्हा दत्तक घेतल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधान वाचून मला मोठी गंमत वाटली होती.

We do not run at home on adoption; Sharad Pawar's criticism on chief minister | आम्ही दत्तकाच्या जोरावर घर चालवत नाही; मुख्यमंत्र्यांवर शरद पवारांची टीका

आम्ही दत्तकाच्या जोरावर घर चालवत नाही; मुख्यमंत्र्यांवर शरद पवारांची टीका

Next

मुंबई : नाशिक जिल्हा दत्तक घेतल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधान वाचून मला मोठी गंमत वाटली होती. आम्हाला माहीत होते की हे दत्तक विधान काही टिकणार नाही. त्यामुळे यापुढे अशा दत्तक बापावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
नाशिकमधील माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे आणि अद्वैत हिरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासासाठी नाशिक दत्तक घेतल्याचे विधान केले होते. याचा संदर्भ घेत पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
बाहेरच्या दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही, अशी टीका करतानाच आपला खराखुरा बाप शेतकरी आहे तोच आपला खरा घटक आहे. त्याच्या मदतीने पुढे जाऊया, असेही पवार म्हणाले. हिरे कुटुंबीयांची विचारधारा चांगली आहे. ते दुसऱ्या पक्षात गेले तो अपघात होता. त्या अपघातातून सावरून त्यांनी त्यांची गाडी योग्य वळणावर आणली आहे. भुजबळांना बळ देण्यासाठी हे दोन्ही तरुण नेते आता उभे ठाकले असल्याचेही पवार म्हणाले.

Web Title: We do not run at home on adoption; Sharad Pawar's criticism on chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.